शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

२५ वर्षांपासून खमाटा बायपास रस्त्याची उपेक्षा

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.

कोसमतोंडी : गोंदिया-भंडारा या दोन जिल्ह्याला जोडणारा बहुचर्चीत खमाटा मार्ग कोसमतोंडीजवळ अडलेला आहे. कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणारा प्रस्तावित असलेल्या खमाटा मार्गाची मागील २५ वर्षापासून उपेक्षा होत आहे.या मार्गावर कोसमतोंडी जवळील नाल्यावर दीर्घ प्रतिक्षेनंतर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढलेली आहे. परंतु कोसमतोंडीच्या बाहेरुन जाणाऱ्या खमाटा बायपासचे काम का अडलेले आहे असा प्रश्न या परिसरातील जनतेला पडलेला आहे. शासनाने या रस्त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. परंतु अजूनपर्यंत या रस्त्याचे बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही. त्यामुळे हा रस्ता अधिकारी व राजकीय पदाधिकारी मिळून कागदावरच तर पूर्ण केला नाही ना, अशी शंका जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.२५ वर्षापूर्वी खमाटा बायपास रस्त्याचा आराखडा कोसमतोंडी गावाच्या बाहेरुन प्रस्तावित करण्यात आला. याला संबंधित विभागाची मंजुरीही मिळाली. काही ठिकाणी नालीचे काम पण झाले. त्यानंतर मात्र काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. खरे पाहता या रस्त्याच्या कामात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित करण्यात आली त्यांना शासनाकडून मोबदला मिळाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावणी मुरते कुठे? असा प्रश्न कोसमतोंडी परिसरातील जनतेसमोर आहे. बायपास रस्त्याअभावी जड वाहनेसुद्धा गावातून जातात. त्यामुळे लहान मोठे अपघात नेहमीच घडत असतात. सतत वाढत असलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे ग्रामपंचायतच्या नाल्यांचे मोठे नुकसान होत आहे व वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी बस गावाबाहेरच थांबते. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत गावात यावे लागते. धानोरी, लेंडेझरी व मुरपार येथे बस जातच नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन वर्षापूर्वी या रस्त्याच्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येत असल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सदर बायपास कधी पूर्ण होणार अशा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे. (वार्ताहर)