शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल मिळाले नसल्यास ॲपवर स्वतःच करा अर्ज आणि मिळवा आपल्या हक्काचे घरकुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:30 IST

गरजवंतांना मिळेल हक्काचा निवारा : स्वतःच सर्वेक्षण करा अन् द्या घोषणापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आम्हाला गरज असताना घरकूल दिले नाही, श्रीमंतांची नावे घरकुलाच्या यादीत आहेत, सरपंच, सचिवाने नाव यादीतून वगळले, अशी ओरड नेहमीच असते. यावरून अनेकदा वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतात. पण, आता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तर, घरकुलासाठी होणारी ओरड कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारने ज्यांना घरकूल मिळाले नाही, त्यांच्यासाठी 'आवास प्लस २०२४' हे अॅप जारी करून या अॅपवर घरकुलासाठी अर्ज करा अन् हक्काचे घरकूल मिळवा, असे जि. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने २ कोटी घरे बांधण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरू करण्याची घोषणा केली आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या घरकुलाच्या सर्वेक्षणासंदर्भात मोठी ओरड होती. प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लोकांनाही घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतला नाही आणि कच्या घरात ज्यांचे राहणे आहे, अशा लोकांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे. आता घरकूल आम्हाला मिळाले नाही, अशी ओरड कायमची थांबणार आहे.

१ एप्रिल पासून होणार सुरुवातआपल्याला घरकूल हवा असेल, तर 'आवास प्लस २०२४' या अॅपवर जाऊन १ एप्रिल २९२५ पासून अर्ज करू शकता. त्या अर्जाची चाचणी होईल. हे अर्ज ग्रामीण भागातील नागरिकच करू शकतात. या योजनेचा लाभअधिक लोकांनी घ्यावे, असे आवाहन ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे.

ग्राम पंचायत अधिकारी राहणार सर्वेअरआपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी हा या घरकुलांचा सर्वेअर राहणार आहे. नागरिकांनी 'आवास प्लस २०२४' या अॅपवर स्वतः अर्ज करावे किंवा आपल्या गावातील ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडून अर्ज करून घ्यावे. पात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकाला घरकुलाचा लाभ हमखास मिळणार आहे, असे विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले.

"जिल्ह्यातील गरजू नागरिकांना घरकूल देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती सज्ज झाल्या आहेत. सर्व ग्राम पंचायतींनी ई-केवायसी केली असून, ग्राम पंचायत अधिकारी या घरकुलांचे सर्वेअर म्हणून काम पाहत आहेत. गरजूंनी स्वतः अॅपवर जाऊन अर्ज करावे किंवा ग्राम पंचायत अधिकाऱ्यामार्फत घरकुलासाठी अर्ज करावे."- एम. मुरूगानंथम, मुकाअ जि. प. गोंदिया.

"सन २०१८ च्या घरकुलाच्या यादीत ज्यांचे नाव घरकुलासाठी आले नाही आणि ज्यांना घरकुलाची गरज आहे. अशा सर्वांना केंद्र शासनाकडून घरकूल देण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी घरकुलासाठी सेल्फ अर्ज करावे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे घरकुलासाठी अर्ज करावे."- लायकराम भेंडारकर, अध्यक्ष जि.प. गोंदिया.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना