पत्नी व मुलगा आलेगोंदिया : बिरसोला रेल्वे स्थानकाजवळ ३ एप्रिल रोजी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. आता त्याची ओळख पटली आहे. मृताच्या पत्नीने मोक्षधामात जिथे तिच्या पतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तिथे जावून पूजा-अर्चना केली व परतली. बिरसोला रेल्वे स्थानकावर आढळलेली व्यक्ती बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आरंभा येथील रहिवासी विजय भरतलाल जायस्वाल (३८) हे होते. त्यांची पत्नी व नातलगांनी ६ एप्रिल रोजी गोंदिया गाठले. मृतकाचे कपडे व सामान पाहून त्यांनी ओळख पटविली. मृतक विजय कोणत्या कामासाठी बिरसोला-काटी येथे आले होते, याची माहिती मिळू शकली नाही. परंतु याच परिसरात राहणाऱ्या कुटुंबीयांच्या माहितीवरून विजय जायस्वालचे कुटुंबीय गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. (प्रतिनिधी)
‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:27 IST