शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

मी आत्महत्या करतोय.... पत्नीशी संवाद साधत गुलाबने आवळला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

अति मद्य सेवन करून त्याने घराची वाट न धरता आपल्या शेतशिवाराची वाट धरली. कोणतेही टेन्शन, त्रास, कर्जबाजारीपणा नसताना सुद्धा गुलाबने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन शेतामध्ये गेला. गळफास घेण्यापूर्वी त्याने पत्नी आशाला मोबाईलवरून फोन करून ‘हे माझे शेवटचे बोलणे आहे. मी मरतो... मरणाले ये जो एवढे बोलून गुलाबने आपल्या लहान २ मुलांचा, पत्नीचा विचार न करता शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. 

ठळक मुद्दे ‘हे माझे आता शेवटचे बोलणे..’ भाऊ शेतात पोहोचेपर्यंत प्राणज्योत मालवली

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : पत्नी, २ मुले व आई सोबत एकत्र राहून संसाराचा गाडा ओढणारा गुलाब एकाएकी दारूच्या आहारी गेला. गुण्यागोविंदाने त्यांचा संसार फुलत होता. या सुखी संसाराला काळाची नजर लागली. अत्र्यांच्या ‘एकच प्याला’ नाटकाप्रमाणे गुलाबने आपल्या सुखी संसाराची राखरांगोळी केली. गळफास घेण्यापूर्वी गुलाबने पत्नीशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. हे माझे शेवटचे बोलणे. ‘मी आता मरतो,... मरणाला येशील’ असे बोलून स्वत:च्या शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. मन हेलावणारी ही घटना मंगळवारी (दि. २४) अर्जुनी माेरगाव तालुक्यातील येरंडी विहीरगाव येथे घडली. गुलाब महादेव हेमणे (३७ वर्षे) असे त्या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी विहीरगाव या गावात ही मनाला सुन्न करणारी दुर्दैवी घटना आहे. येरंडी येथील महादेव हेमणे यांना मंगेश व गुलाब अशी दोन मुले, दोघांचेही लग्न होऊन वैवाहिक जीवन जगत आहेत. वडिलोपार्जित ४ एकर जमीन. दोन भावांचे वेगवेगळे कुटुंब, गुलाब हा लहान मुलगा असल्याने आई वडिलांसोबत पत्नी व २ मुलांसह स्वतंत्र राहत होता. जुलै २०२१ मध्ये वडिलांचा मृत्यू झाला. गुलाबकडे ३ एकर शेतजमीन होती. पत्नी आशा, मुलगा सूरज (११), सोहम (७) व आई असे ५ जणांच्या कुटुंबाचा गुलाब हा कर्ता पुरुष. दही-दूध विकणे, शेती करून कुटुंबाची घडी बऱ्यापैकी बसवली होती. घरामध्ये सर्व आनंदीमय वातावरण. सर्व व्यवस्थित कारभार सुरू होता. सासुरवाडी परसटोला (एकोडी) येथे वैवाहिक कार्यक्रम असल्याने गुलाब आपल्या कुटुंबासह गावाला गेला होता. रब्बीच्या हंगामातील धानाचे पीक कापणीला आल्याचे सांगून पत्नी व मुलांना सासुरवाडीमध्ये ठेवून सोमवारी रात्रीपर्यंत गुलाब स्वगावी परतला. मोठा भाऊ मंगेशकडे रात्रीचे जेवण केले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळच्या वेळी तेंदूपत्त्याचे १५०० रुपये फळी मुन्शीकडून मागून घेतले. घराशेजारील गावातील ओळखीच्या बाईला ‘मरनाले येशील’ असे म्हणून गुलाब घरातून बाहेर निघून गेला. 

 ‘हे माझे आता शेवटचे बोलणे..’ - मंगळवारी घटनेच्या दिवशी गावाजवळील बाक्टी येथे गेला, काहींचे उधार पैसे त्यांनी दिले. अति मद्य सेवन करून त्याने घराची वाट न धरता आपल्या शेतशिवाराची वाट धरली. कोणतेही टेन्शन, त्रास, कर्जबाजारीपणा नसताना सुद्धा गुलाबने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन शेतामध्ये गेला. गळफास घेण्यापूर्वी त्याने पत्नी आशाला मोबाईलवरून फोन करून ‘हे माझे शेवटचे बोलणे आहे. मी मरतो... मरणाले ये जो एवढे बोलून गुलाबने आपल्या लहान २ मुलांचा, पत्नीचा विचार न करता शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. 

 भाऊ शेतात पोहोचेपर्यंत प्राणज्योत मालवली 

- जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. फोन येताच मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली. प्रेताची उत्तरीय तपासणी करून येरंडी गावात सायंकाळी गुलाबवर अंतिम संस्कार करण्यात आले. 

 

टॅग्स :Deathमृत्यू