शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

शिकार झालेला ‘तो’ वाघ नवेगावातील?

By admin | Updated: October 19, 2016 02:47 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघाच्या कातडीची तस्करी उघडकीस आणून कातडीसह तीन आरोपींना पकडल्यानंतर

वाघीण व दोन बछडे गायब : वनविभागाची गोपनियता देतेय संशयाला वावगोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघाच्या कातडीची तस्करी उघडकीस आणून कातडीसह तीन आरोपींना पकडल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे. मात्र या प्रकरणाचे गूढ उकलण्यास वनविभाग अजून तयार नाही. दबक्या आवाजातील चर्चेनुसार नवेगावबांधच्या वनक्षेत्रातून गायब असलेल्या वाघिणीची शिकार झाली असून तिचीच ती कातडी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील एक मादा व तिचे दोन बछडे दोन वर्षापासून बेपत्ता आहेत. दोन वर्षापूर्वी अर्जुनी-मोरगाव ते गडचिरोली या दक्षिण परिसरात सदर वाघिण दोन बछड्यांसह फिरत होती. या वाघिणीला बछड्यांसह अनेकांनी पाहिले. परंतु ती वाघिण अचानक बेपत्ता झाली. चिचगड-कोरची परिसरात या वाघांचा सहवास होता. त्यादरम्यान वाघिणीसह दोन्ही बछड्यांची शिकार तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून यासंदर्भात वनविभागाला कोणती माहिती मिळाली हे अद्याप बाहेर आलेले नाही. परंतु वनविभाग तपासाच्या नावावर कमालीची गुप्तता पाळत आहे. वनविभागाने या प्रकरणात ११ आरोपीन्ाां अटक केली असून त्यांना २० पर्यंत वनकोठडी मिळविली आहे. वाघाची शिकार ज्याने केली त्याचे नावही वनविभागाला माहित झाले परंतु शिकार कोणत्या ठिकाणी व कुठल्या वाघाची झाली ही माहिती वनविभाग सध्यातरी उघड करायला तयार नाही. नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिसरात दोन वर्षापूर्वी वावरणारी वाघिण बछड्यांसह बेपत्ता झाली. तिची नोंद वनविभागाकडे नसली तरी वनविभाग हे प्रकरण आपल्या अंगावर शेकू नये यासाठी गुप्तता पाळत असल्याचे बोलले जाते.या प्रकरणात भावेश करमकर (२५) रा.चारगाव, सुरेंद्र शहारे रा.कन्हाळगाव, राजकुमार उर्फ पप्पू मेश्राम (२५) रा.परसटोला यांना आधीच अटक झाली होती. तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले होते. वन विभागाच्या तपासादरम्यान हेमंत भरत अरकरा (४८) रा.गडेगाव, सुरेश केवलराम राऊत (२९) रा.शिरपूर, विलास हरिदास बडोले (३४) रा.अंभोरा, महेंद्र विलास धमगाये (४२) रा.खामखुर्रा, रामदास संमाराम मडावी (२९) रा.गुडरी व शिवराम सुंदर तुलावी (२६) यांना अटक झाली. त्यानंतर आणखी दोन जणांना ताब्यात घेतल्याने आरोपींची संख्या ११ वर गेली आहे.परंतु पुढे जे आरोपी अटक करण्यात येत आहे त्या आरोपीची माहिती प्रसार माध्यमांंना देण्यास वनविभाग का टाळत करीत आहे, हे न समजणारे कोडे आहे. (तालुका प्रतिनिधी) गोपनियता का?वन्यप्राण्यांचा संरक्षणासाठी वन्यजीव प्रेमी रात्रंदिवस एक करून धडपड करतात. परंतु त्यांना ही या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समाजापुढे येऊ नये यासाठीच ही धडपड नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.‘त्या’ शिकाऱ्याचा अपघाती मृत्यूसदर वाघाची शिकार करणारा शिकारी गडचिरोलीच्या खोबरामेंढा येथील असून त्याचे नाव दलपत असल्याचे उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. परंतु शिकार करणाऱ्या त्या आरोपीचा अपघातात मृत्यु झाला, असे वनविभागाच्या सूत्रांकडून समजते. शिकार करणाऱ्याचे नाव वनविभाग देते, परंतु अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वनविभाग लपवून ठेवत आहे. शिकाऱ्यांच्या सोबत असलेले इतर आरोपी फरार होऊ नये म्हणून नाव गुपीत ठेवत असल्याचे रामगावकर म्हणाले.