शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा घ्यावा? : अर्ज कुठे करावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:56 IST

अडीच हजारांची शिष्यवृत्ती : किमान ६० टक्के गुण आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

विशेषतः मातंग समाजातील गुणवत्ताधारक, गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. समाजातील हुशार, होतकरू विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असले तरी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ एकदाच मिळतो.

कागदपत्रे काय लागतात ?शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पत्राच्या स्वयं साक्षांकित केलेल्या छायाप्रती जोडाव्यात, अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे क्रमप्राप्त आहे.

कोणाला किती?

  • दहावी : एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
  • बारावी: दीड हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम आह
  • पदवी व पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
  • अभियांत्रिकी व वैद्यकीय: क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. 

प्राचार्यांचे हमीपत्रशासनाच्या अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थी, प्राचार्यांचे एकत्रित हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.

कोणाला लाभ घेता येतो?

  • महाविद्यालये-विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे (कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय निवडशिष्यवृत्तीसाठी कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय निवड केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच दिली जाते.

अर्ज कोठे करायचा?अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ येथे करावा.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना