शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तुला आई कसं म्हणू? जिवंत नवजात शिशुला कचऱ्यात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 11:13 IST

डवकी येथील प्रकार : गावकऱ्यंनी शिशुला केले रुग्णालयात दाखल 

देवरी(गोंदिया) : जिवंत नवजात शिशु कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळल्याची घटना रविवारी (दि.23) सकाळी देवरी तालुक्यातील डवकी येथे उघडकीस आली. सरपंच व गावकऱ्यांनी या नवजात शिशुला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात केले. सध्या, हा नवजात शिशु सुखरुप असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  

प्राप्त माहितीनुसार, डवकी येथील सरपंच उमराव बावणकर हे नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे फिरायला जात होते. त्यावेळी, सिध्दार्थ हायस्कूलच्या जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्यांना नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ जावून पाहिले असता एक नवजात जिवंत शिशु आढळले. त्यांनी लगेच याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या नवजात शिशुचा जन्म शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला असावा असे बोलले जात आहे. नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून जाणारी आई कोण याचा शोध गावकरी व पोलीस घेत आहेत. रात्रभर हा नवजात शिशु कचऱ्यावरच पडून होता. तो जिवंत असून डवकीवासीयांच्या मदतीने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नवजात शिशुला कचाऱ्यांच्या ढिगाऱ्यावर टाकून जाणारी ती र्निदयी माता कोण याचीच परिसरात आहे. रात्रभर नवजात शिशु कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पडून असूनही सुदैवाने सुखरुप असल्याने देवतारी त्याला कोण मारी असाच प्रयत्य आला. देवरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. कुत्र्यांनी केले रक्षणडवकी येथील सिध्दार्थ हायस्कुलच्या जवळील रस्त्याच्या कडेला हा नवजात शिशु आढळला त्या ठिकाणी तीन ते चार कुत्रे बसले होते. मात्र, त्यांनी या नवजात शिशुला कुठलही ईजा पोहचविली नाही. याच कुत्र्यांनी नवजात शिशुचे रात्रभर रक्षण केल्याचे डवकीचे सरपंच उमराव बावणकर यांनी सांगितले. ती महिला गावाबाहेरील असल्याची चर्चा जिवंत नवजात शिशुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून देवून जाणारी महिला ही गावाबाहेरील असवी असा संशय गावकऱ्यांनी देवरी पोलिसांकडे व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPoliceपोलिसgonda-pcगोंडा