शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

उष्ण लहरींनी जिल्ह्याला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:52 IST

दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला.

ठळक मुद्देतीन दिवस तीव्र लाट : हवामान खात्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला. हवामान खात्याने २३ ते २६ तारखेपर्यंत उष्णतेच्या तिव्र लाटेचे संकेत दिले असून मंगळवारी त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून आले.अरबी सागर ते बंगालच्या खाडीपर्यंत गत १० दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वातावरण निर्माण होवून पावसाच्या सरी कोसळल्या. आता दाब कमी होवून वाऱ्याची गती संथ झाली आहे. त्यामुळे वातावरणात प्रतिकूल अशा प्रमाणात दाब निर्माण होवून तापमान वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात विदर्भातील सहा जिल्ह्यात तापमानात वाढ होवून २३ ते २६ तारखेदरम्यान उष्ण लहरी प्रवाहीत होणार असा अंदाज आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या हा अंदाज मंगळवारपासून (दि.२३) असून त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याची अनुभुती दिसून आली. मंगळवारी सकाळपासूनच रखरखत्या उन्हामुळे वातावरण चांगलेले दिसले.मागील चार-पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमान ३७ ते ३८ डिग्रीच्या घरात तापमान मंगळवारी वाढून ४० च्या घरात गेले होते. शिवाय उष्ण लहरींमुळे उकाडा वाढून अंगाची लाहीलाही होवू लागली होती. मंगळवारपासून सुरू झालेल्या उष्ण लहरींनी पहिल्याच दिवशी रंग दाखविल्याने आणखी दोन दिवसांना घेऊन त्याचा सर्वांना धसकाच बसला आहे.आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनउष्ण लहरींमुळे घराच्या आत बसून अंग भाजत असल्याचे वाटत असतानाच या तीन दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे वाहन हवामान व आरोग्य खात्याने केले आहे. या तीन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळणे हा सर्वात रामबाण उपाय आहे. याशिवाय, आरोग्य विभागाकडून उन्हापासून बचावासाठी देण्यात आलेल्या टिप्सचे पालन करणे आता गरजेचे झाले आहे.

टॅग्स :weatherहवामान