शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

२ कोटी खर्च करुनही रुग्णालय अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:16 AM

छोट्यातल्या छोट्याही आरोग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सोय असावी असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात २४ तास विजेची सोय नाही.

ठळक मुद्देएक्सप्रेस फिडर केवळ नाममात्र : बायपास केली अडचण, रुग्णालयातील समस्यांकडे प्रशासनाचा कानाडोळा,

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छोट्यातल्या छोट्याही आरोग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सोय असावी असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा वैद्यकीयमहाविद्यालयात २४ तास विजेची सोय नाही. २४ तास विजेची सोय मिळावी यासाठी आरोग्य संस्थेने मागील दहा वर्षात दोन वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला २ कोटी १५ लाख रूपये मोजले. मात्र यानंतरही पैसे घेऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग २४ तास विद्युत पुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे.साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी असलेले गोंदियाचे वैद्यकीयमहाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय आजघडीला भारनियमनाच्या संकटातून जात आहे. वीज आल्यावरच शस्त्रक्रिया सुरू करू असे डॉक्टरांना रूग्णांच्या नातेवाईकांना सांगण्याची वेळ आली आहे. गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय येण्यापूर्वी म्हणजेच १० वर्षापूर्वी डॉ. के.जी. अग्रवाल प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २४ तास विद्युुत पुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडरसाठी १ कोटी ४० लाख रूपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला दिले होते. त्या पैश्यातून एक्सप्रेस फिडर बसविण्यात आले. खमारीच्या सबस्टेशनवरून एक्सप्रेस फिडरचा केबल केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणण्यात आले. परंतु काही दिवसच सुरू राहिल्यानंतर एक्स्प्रेस फिडरची सेवा खंडीत झाली. गोंदिया शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपासमुळे एक्सप्रेस फिडरचे केबल तुटले त्यामुळे सुरूवातीचे एक वर्ष सोडून एक्सप्रेस फिडरची सेवा बंद आहे.त्यानंतर या एक्सप्रेस फिडरच्या सेवेकरीता वारंवार आरोग्य विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर जनरेटरच्या साह्याने विद्युत उपकरणे सुरू करण्यात आले. परंतु सुरू असलेले जनरेटरही बंद पडले. त्यानंतर केटीएसमध्ये जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणून कार्यरत असताना डॉ.रवी धकाते यांनी पुन्हा विजेची सोय करण्यासाठी ७५ लाख रूपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला दिले. याला आता पाच वर्षाचा कालावधी लोटला. मात्र त्यानंतरही आतापर्यंत विजेची समस्या मार्गी लागली नाही. ७५ लाखांपैकी ५ लाखाचे ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहे. परंतु ७० लाखाचे काम अजूनही झाले नाही. १० वर्षाच्या काळात २ कोटी १५ लाख रूपये विजेची सोय करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. परंतु एवढी मोठी रक्कम मोजूनही आजही गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालय, केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय अंधारात आहे.विजेवर ठरते शस्त्रक्रियेची वेळअत्यंत गंभीर असलेल्या रूग्णावर शस्त्रक्रिया करायची असल्यास त्या रूग्णाची शस्त्रक्रिया डॉक्टर करीत नाही. विद्युत पुरवठा सुरू असलेल्या काळात गंभीर रूग्णावर शस्त्रक्रिया करायची असल्यास लाईट येण्यास वाट पाहावी लागते. अशातच रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.ना हाय होल्टेज टेंशन; ना जनरेटरवर्षाकाठी ७ ते ८ हजार महिलांची प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात होते.जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असून गोरगरीब महिलांना प्रसूतीसाठी याच रूग्णालयात आणले जाते. या रूग्णालयाला २४ तास विजेची सोय उपलब्ध नाही. हाय होल्टेज टेंशन व जनरेटरची गरज असतानाही या रूग्णालयात याची सोय नाही. येथे येणाऱ्या गर्भवतींना विद्युत अभावी उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय