लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : इंग्रजी शिक्षणाचा फॅड व दर्जेदार शिक्षणाच्या पोकळ हौसेखातर घरापासून लांब अंतरावर शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत हॉटेलवमध्येच होमवर्क करीत असल्याचा धक्कादायक प्रकार जवळील बिर्सी येथे सुरु आहे.विद्यार्थी आधुनिक युगात वावरतांना सक्षम व्हावा, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याच्या पोकळ हौसेखातर पालक पाल्यांना शिक्षणासाठी दूरवर पाठवितात. परंतू दूरवर जावून शिक्षण घेणे काही गैर नसले तरी मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. तिरोडा तालुक्यातील बिर्सी फाटा हे तिरोडा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव बिर्सी येथे प्राथमिक, माध्यमिक, कॉन्व्हेंट व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थी एस.टी.बस वा खासगी बसने प्रवास करीत असतात. बिर्सी हे मुख्य मार्गावरील चौरस्त्याचे ठिकाण आहे. परंतु येथून सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान विद्यार्थ्याना ये-जा करण्यासाठी मानव विकासच्या बसेस उपलब्ध नाहीत. यामुळे बिर्सी फाटा येथे विद्यार्थ्याना दररोज तास-दीड तास ताटकळत बसावे लागत असते. अनेकवेळा विद्यार्थी येथील हॉटेलवरच बसून शिक्षकांनी दिलेला गृहकार्य करतात. याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली असता त्यांना शाळेतून घरी जायला रात्र होत असल्याने घरी गृहकार्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी बसस्थानकावरील हॉटेलमध्येच बसून गृहकार्य करीत असतात. सदर प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभय पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांना ही बाब लोकमत प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिली. इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्याच्या जीवन व भविष्याशी पालकांनी खेळ न करता गावातीलच शाळेच्या भौतिक विकासाकडे व विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन डॉ.पाटील यांनी केले आहे.बसफेऱ्याविषयी आगार व्यवस्थापक अनभिज्ञबिर्सी येथे एस.टी.बसच्या प्रतीक्षेत विद्यार्थी दोन तास हॉटेलवर बसून राहतात. तिथेच होमवर्क करीत असल्याची बाब तिरोडा एस.टी.आगाराचे आगार व्यवस्थापक पंकज दांडगे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बिर्सी येथून जाणाºया मानव विकास बस विषयी माहिती विचारली असता आपण तिरोडा आगारात मागील तिनच महिन्यापासून कार्यरत असून येथील बसफेºयाविषयी अनभिज्ञ असल्याचे सांगीतले.
बसच्या प्रतीक्षेत हॉटेलमध्ये गृहपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:16 IST
इंग्रजी शिक्षणाचा फॅड व दर्जेदार शिक्षणाच्या पोकळ हौसेखातर घरापासून लांब अंतरावर शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत हॉटेलवमध्येच होमवर्क करीत असल्याचा धक्कादायक प्रकार जवळील बिर्सी येथे सुरु आहे.
बसच्या प्रतीक्षेत हॉटेलमध्ये गृहपाठ
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ : बिर्सी येथील प्रकार