शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

मागील काही दिवसांत तिरोडा  परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्यामुळे परिसरात सक्रिय टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व पोलीस टोळीच्या मागे महिन्याभरापासून लागले होते. या टोळीचे सदस्य फकीर टोली काचेवानी येथील समजले असता, त्यानुसार पोलिसांनी  जनतेला सतर्क करून त्या भागात जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : गोंदिया, बालाघाट, भंडारा व नागपूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे सतत  गुन्हे करणाऱ्या टोळीला तिरोडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत चोरी केलेल्या २ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीकडून परिसरातील  बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांत तिरोडा  परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्यामुळे परिसरात सक्रिय टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व पोलीस टोळीच्या मागे महिन्याभरापासून लागले होते. या टोळीचे सदस्य फकीर टोली काचेवानी येथील समजले असता, त्यानुसार पोलिसांनी  जनतेला सतर्क करून त्या भागात जास्त लक्ष केंद्रित केले आहे. अशात शनिवारी (दि.२८) संतोष चंदनलाल हरिणखेडे (२६,रा.मजितपूर) यांची मोटरसायकल फकीरटोली-काचेवानी येथे रस्त्याच्या कडेला उभी करून शौचास गेला असता, चोरी गेल्याची  माहिती फोनद्वारे मिळाली. त्यानुसार उप-विभागीय पोलीस अधीकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, हवालदार मुकेश थेर, बावने, नायक पोलीस शिपाई रक्षे, सवालाखे, प्रशांत कहलकर, चालक शिपाई शेख, चोपकर, दमाहे यांनी त्या भागात लोकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. अशात शेतात खोलगट भागात झाडाखाली ४ व्यक्ती मोटरसायकलच्या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड करताना दिसले असता, त्यांना घेराव करून पकडण्यात आले. अजय ताराचंद कनोजे (२८,रा. बिरसी), गोलू इसूपखा पठाण (३), अनिल भट्टीलाल कुंभरे (३०) व रोशन प्यारेलाल राऊत (३५, सर्व रा. फकीरटोली-काचेवानी) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे.  त्यांच्या जवळून मोटारसायकल क्रमांक एमएच ४0-एव्ही ०८५३ किंमत ४० हजार रुपये व मोटारसायकल क्रमांक एमएच ४९-एएक्स ६४७९ किंमत ७० हजार रुपये असा एकूण एक लाख २० रुपयांचा मुद्धेमाल मिळून आलेला आहे. आरोपी अजय कनोजे  हा मोटरसायकल चोरी व घरफोडीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्यांनी गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. या टोळीकडून तिरोडा परिसरातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस