शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नेतृत्व : सीईओंच्या अडेलतट्टू धोरणाचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या एकूण मंजूर रिक्त पदांपैकी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग ३ व ४ च्या पदांवर १० टक्के आरक्षणाच्या नियमान्वये रसळसेवेत नियुक्ती करण्याचे नियम केले. मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे ही भरती वारंवार टाळली जात आहे. याचा निषेध करीत ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने बुधवारी (दि.२१) जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. पात्र ३२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही देण्यात येतील अस सांगितले होते, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने ही भरती प्रक्रीया स्थगित केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर,चंद्रपूर, गजचिरोली, भंडारा, बुलडाणा, अकोला, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, ठाणे, ,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आदी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायत कर्मचारी आणि अनुकंपा पदभरतीची कार्यवाही मागील तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली आहे. पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.असे असताना गोंदिया जिल्हा परिषद पदभरतीला आडकाठी का आणत आहे, हा प्रश्न असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आता पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेने पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे व पदभरती करून घ्यावी अशी मागणी करीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.२१) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद