लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : हायड्रोसिलच्या शल्यक्रि येसाठी आलेल्या रुग्णाला मधुमेह असल्याने रिजेक्ट केल्यानंतरही चिकित्सकाने शल्यक्रिया केली. या रुग्णाचा गुरुवारी (दि.१६) पहाटे मृत्यू झाला. तो एचआयव्ही बाधित सुध्दा होता. यामागे डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची चर्चा आहे.प्राप्त माहितीनुसार ७ जानेवारी रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हायड्रोसिल शल्यक्रि या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १४ रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्या.यात एका एचआयव्ही बाधित रुग्णाचा समावेश होता. तो शल्यक्रि येसाठी आल्यानंतर त्याच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात एचआयव्ही बाधित असल्याचे दिसून आले नाही. मात्र मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. २००९ पासून तो एचआयव्ही बाधित होता. मात्र रुग्णालय प्रशासनाला याची माहितीच नव्हती.रक्त तपासणी अहवालात मधुमेह झाल्याचे आढळल्याने डॉक्टरांनी त्याला हायड्रोसिल शल्यक्रि येसाठी रिजेक्ट केले. तसा शेरा नोंदविण्यात आला. मात्र चिकित्सकाने त्याची शल्यक्रिया केली. शल्यक्रियेनंतर तो एचआयव्ही बाधित असल्याचे कळले. रविवारी सायंकाळी अचानक त्याची प्रकृती खालावली. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रात्री त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूरच्या डॉक्टरांनी त्याला गावी घेऊन जाण्यास सांगितले. अखेर गुरु वारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. रिजेक्टेड रूग्ण असतानाही त्याची करण्यात आलेली शल्यक्रिया हेच मृत्यूचे कारण असल्याच्या चर्चा आहेत. शिवाय तो बाधित रुग्ण असतांनाही त्याचा निगेटिव्ह अहवाल येणे याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात शुकशुकाट होता.प्रशासन निद्रावस्थेतयेथील ग्रामीण रुग्णालय प्रशासन विविध कारनाम्यांनी प्रसिध्द आहे. येथे अनेक प्रकार घडतात. आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र धृतराष्ट्राची भूमिका बजावतात.गंभीर प्रकरण घडूनही रुग्णालयाला साधी भेट देण्याचे सौजन्य आरोग्य विभागाचे अधिकारी बाळगत नाही. या प्रकरणानंतर अजूनही कोणत्याच अधिकाऱ्याने येथे भेट दिली नाही. यापूर्वी ह्दयविकाराचा धक्का बसलेले रूग्ण रूषी चांदेवार हे रुग्णालयात आले. डॉक्टर हजर नव्हते. अखेर त्यांचा मृत्यू झाला. मृतकाला घरी नेण्यासाठी मृत घोषित करायला डॉक्टर उपलब्ध नसणे ही गंभीर बाब नाही का? डॉक्टरची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबीयांना अखेर मृतदेह विनापरवानगीने घरी न्यावे लागले. याची रूग्णालयाच्या दाखल रजिस्टरमध्ये साधी नोंद नाही. मात्र रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत नोंदी कैद आहेत. एवढा गंभीर प्रकार घडूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी करण्याचे सौजन्य दाखिवले नाही.
एचआयव्ही बाधित रुग्णाचा शल्यक्रि येनंतर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST
या शिबिरात एकूण १४ रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्या.यात एका एचआयव्ही बाधित रुग्णाचा समावेश होता. तो शल्यक्रि येसाठी आल्यानंतर त्याच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात एचआयव्ही बाधित असल्याचे दिसून आले नाही. मात्र मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. २००९ पासून तो एचआयव्ही बाधित होता. मात्र रुग्णालय प्रशासनाला याची माहितीच नव्हती.रक्त तपासणी अहवालात मधुमेह झाल्याचे आढळल्याने डॉक्टरांनी त्याला हायड्रोसिल शल्यक्रि येसाठी रिजेक्ट केले.
एचआयव्ही बाधित रुग्णाचा शल्यक्रि येनंतर मृत्यू
ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा ठरला बळी