शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पडीक जमिनीच्या शेतकºयांना मदतीचा हात द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 21:47 IST

तालुक्यातील ८० टक्के जनता शेतीच्या भरवशावर जीवन जगत आहे. यंदा जिल्ह्यात सर्वत्र अल्प प्रमाणात पाऊस झाला.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : अधिकारी-कर्मचाºयांची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील ८० टक्के जनता शेतीच्या भरवशावर जीवन जगत आहे. यंदा जिल्ह्यात सर्वत्र अल्प प्रमाणात पाऊस झाला. पावसाच्या अवकृपेमुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील बºयाच शेतकºयांची जमीन पडीक राहिली. या पडीक शेतजमीन असलेल्या शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५५ हजार ४६१ हेक्टर आर आहे. तर पिकाखालील क्षेत्र २५ हजार ७८७ हेक्टर आर आहे. त्यात रब्बी पिकाखाली पाच हजार सातशे नऊ हेक्टर आर क्षेत्र आहे. तालुक्यातील बाम्हणी, खडकी, मनेरी, कनेरी,घोटी, म्हसवानी, सडक-अर्जुनी, केसलवाडा, वडेगाव, रेंगेपार, डोंगरगाव, खजरी, डव्वा, म्हसवानी, पांढरी, मालीजुंगा, खाडीपार, गोंगले, गिरोला, हेटी, सौंदड, राका, खडकी, जांभळी, पाटेकुर्रा आदी गावांजवळून वाहणाºया नदीवरील साधे बंधारे, कोल्हापुरी बंधारे यांना पाट्या किंवा माती अडवून पाणी थांबविले असते तर शेतकºयांना काही प्रमाणात पिके वाचविणे शक्य झाले असते. पण बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे व कर्मचाºयांच्या नियोजनशून्यतेमुळे धानाची शेती वाचविता आली नाही.यावर्षी पाऊस अत्यल्प पडल्यामुळे तालुक्यातील बंधाºयांचे पाणी अडविण्याची गरज होती. पण कोणत्याही अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे नदीला सरळ पाणी वाहून निघून गेले. ते पाणी अडले असते तर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली नसती. दरवर्षी मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीे.तालुक्यातील ज्या शेतकºयांचे जमीन पडीक राहिली त्या शेतकºयांना हरभरा, गहू, वाटाणा, ज्वारी, सूर्यफुल आदींच्या बियाणांचे मोफत वाटप करणे गरजेचे होते. पण शासनाचे तसे कुठलेही आदेश तहसील कार्यालय किंवा कृषी विभाग यांना दिले नसल्याची माहिती आहे. ज्या शेतकºयांची शेती पडीक राहिली, त्या शेतकºयांकरिता मदतीचा हात शासनाने देणे आवश्यक आहे. पण कसलेही आदेश नसल्यामुळे शेतकºयांची मुले शहराच्या दिशेने रोजगाराच्या शोधात पलायन करीत असल्याचे चित्र आहे.यावर्षी रबी पीक होणार काय ?पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे रबी पिके होतील की नाही हे सांगता येत नाही. रब्बी पिके घ्यायचे किंवा नाही अशी सूचना न आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.