पावसाची नोंदलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील २-३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गुरूवारी (दि.२०) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२१) दुपारी १२ वाजतापर्यंत कायम होता. त्यामुळे मागील २४ तासांत १०१.८१ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले भरून वाहत होते. त्यामुळे सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील काही गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला होता.जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसामुळे सालेकसा ते तिरखेडी, सालेकसा ते नानव्हा, भजेपार ते सालेकसा, भजेपार ते साखरीटोला, बोरकन्हार अंजोरा, देवरी ते आमगाव हे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. गोंदिया ते कोहमारा मार्गावर सुद्धा पाणी असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. तिरोडा ते तुमसर मार्गावरील बिरसी येथील पूल पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे तिरोडा तालुक्याचा तुमसरशी संपर्क तुटला होता. गोंदिया बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील जुना पूल पाण्याखाली आता होता. तर पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील नदी नाले तुडूंब भरून वाहत होते. शेतांमधील पाणी रस्त्यांवरु न वाहू लागल्याने रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर आमगाव शहरातील ३-४ वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST
जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती.
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
ठळक मुद्देनदी, नाले तुडुंब : अनेक मार्ग बंद : वस्त्यांमध्ये साचले पाणी, पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, गेल्या २४ तासांत १०१.८१ मिमी.