गोंदिया: जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी परिसरात आज सायकांळी साडेचार वाजल्यानंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकाचे व धान खरेदी केंद्रावरील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. दुपारपासूनच वातावरणात बदल झाला असून ढगाळमय वातावरण झाले आहे. मोठ्यामोठ्याने मेघगर्जना होत असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.
गोंदियातल्या नवेझरी परिसरात गारांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 17:57 IST