शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:23 IST

आरोग्य विभाग सतर्क : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून, कमाल तापमान ३४ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने पारा ४५ अंशाच्या घरात राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच तेथे पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात येत आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. तसेच त्यामुळे मृत्यू होणेही संभव असते. त्यातच आतापासूनच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढत चालले आहे. शहराचा पारा ३४ अंशावर जात आहे. जिल्हा उन्हात खूप तापतो. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे.

उपचार काय ?

  • रुग्णास वातानुकूलित किंवा मोकळ्या हवेशीर खोलीत ठेवणे. खोलीत पंखे, कुलर असावेत.
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न
  • रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, आइस पॅक लावणे
  • आवश्यकतेनुसार सलाइन देणे

उष्माघाताची कारणे

  • उन्हाळ्यात शेतात किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
  • कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये तसेच काच कारखान्यात काम.
  • अधिक तापमानाच्या खोलीत काम.
  • घट्ट कपड्याचा वापर.

उष्माघाताची लक्षणेथकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे.भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना किंवा पेटके येणेरक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था.

प्रतिबंधात्मक उपाय

  • वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे टाळणे.
  • कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी कमी तापमानात करणे
  • उष्णता शोषून घेणारे कपडे (काळी 3 किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत.
  • सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
  • जलसंजीवनीचा वापर, भरपूर पाणी प्यावे.
  • सरबत प्यावे, उन्हामधील काम अधूनमधून थांबवावे. सावलीत विश्रांती घ्यावी.
  • उन्हात बाहेर जाताना चष्मा, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलgondiya-acगोंदिया