शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

कुटुंबकल्याण आयुक्तांनी घेतला आरोग्याचा आढावा

By admin | Updated: December 24, 2014 23:01 IST

जिल्ह्यातील आरोग्य विभागाची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मंगळवारी (दि.२३) कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक मुंबई डॉ.आय.ए. कुंदन गोंदियात दाखल झाल्या.

गोंदिया : जिल्ह्यातील आरोग्य विभागाची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मंगळवारी (दि.२३) कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक मुंबई डॉ.आय.ए. कुंदन गोंदियात दाखल झाल्या. त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा दौरा करून पाहणी केली.जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्याशी चर्चा करून गोंदिया जिल्ह्यातील आरोग्यविषयक स्थिती जाणून घेतली. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील बाल व माता मृत्यू यावर भर देत हा आकडा शुन्यावर कसा येणार याच्या टिप्स दिल्या. गरोदर मातांची शंभरटक्के नोंदणी करून त्यांना नियमीत भेटी देऊन सर्व औषधीचा पुरवठा केला तर माता व बाल मृत्यूची प्रमाण कमी होईल असे सांगितले. या शिवाय गोंदिया जिल्ह्यात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाबाबत चर्चा केली. सिकलसेल, टेलीमेडीसीन बाबत माहिती घेतली. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील डायलेसीस युनिटचीही पाहणी केली. धाबेपवनी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू असल्याने ते काम पाहण्यासाठी त्या निघाल्या. या दौऱ्यात टेक्नीकल सहसंचालक डॉ. जोतकर, आर सी ब्युरोचे उपसंचालक डॉ. कोकणे होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर, गंगाबाईचे अधिक्षक डॉ.संजीव दोडके व कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)