शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने रुग्णांना त्रास

By admin | Updated: June 11, 2014 23:21 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याठिकाणी एकच डॉक्टर असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याची ओरड होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्र व चोवीस गावांचा समावेश आहे. परंतु सर्व कार्यभार एकाच डॉक्टरवर अवलंबून असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळणे कठीण होते. तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी पैशाच्या हव्यासापोटी पुनर्नियुक्त्यांची खैरात वाटली. नविन पदारूढ झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लक्ष पुरवायला वेळ नाही व त्यामुळे शेवटी रुग्णच सेवेअभावी भरडला जातो. ७ जून रोजी दुपारी येथील नागरीक नुतन बंसोड हा आपल्या घराची छावणी करत असताना त्याच्या हाताला सिमेंट पत्र्यांनी दुखापत झाली. तो उपचार घेण्याकरिता आरोग्य केंद्रात गेला असता तेथे फक्त बोरकर नावाची शिपाई होती. तीनेच मलमपट्टी करून दिली. शेंडा परिसर आदिवासी क्षेत्रात मोडत असून नक्षलग्रस्त भाग म्हणून त्याची ओळख आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्य इमारत आहे. शासनाकडून आरोग्य सेवेचा धिंडोरा पिटला जातो. परंतु वास्तविकता वेगळीच आहे. एकच डॉक्टर असल्याने त्यांचेकडे मिटींग, रिपोर्ट, सर्व्हे यासारख्या अनेक कामांचा भार आहे. त्यामुळे ते २४ तास सेवा देऊ च शकत नाही. अनेकदा येथील आरोग्य केंद्रात रुग्णांची ओरड होते. सेवेअभावी कित्येकांनी त्या डॉक्टरवर ताव मारला. प्रसार माध्यमांव्दारे वारंवार डॉक्टरची मागणी करण्यात आली. परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील डॉक्टर शासकीय कामानिमित्त अथवा रजेवर गेले असता दुसरा डॉक्टर नसल्याने रुग्ण सरळ बातमीदाराच्या घरावर हल्ला चढवून आपली कैफियत मांडतानाचे चित्र बरेचदा घडले. तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष पुरवून २४ तास सेवा देण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्वरीत डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे. (वार्ताहर)