शहरं
Join us  
Trending Stories
1
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
2
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
3
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
4
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
5
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
6
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
7
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
8
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
9
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
10
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
11
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
12
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
13
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
14
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
15
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
16
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
17
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
18
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
19
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
20
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश

आरोग्य विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित

By admin | Updated: April 20, 2015 01:06 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी (डाकराम) येथील एएनएम, मलेरिया कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे जानेवारी २०१५ पासून वेतन झाले नाही.

सुकडी (डाकराम) : प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी (डाकराम) येथील एएनएम, मलेरिया कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे जानेवारी २०१५ पासून वेतन झाले नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाकराम येथील स्थायी कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व इतर कर्मचारी यांचे जानेवारी २०१५ पासून वेतन झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी येथील वैद्यकीय अधिकारी यांना वेतन का झाले नाही विचारले असता, त्यांनी वेतन लवकरच होणार असे सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.आर. टेंभुर्णे यांनी सांगितले की, सेवार्थपुस्तक (आॅनलाईन) असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे सेवार्थ झाले नाही. काही कर्मचाऱ्यांचे सेवार्थ झाले. त्यामुळे वेतन उशिरा होणार. येथील सहायक लिपीक शरणागत यांना कोणतेच कामे जमत नसल्यामुळे कार्यालयातील कामे उशिरा होते व त्यांच्यामुळे वेतन झाले नाही, असे सांगितले.लग्नसराई असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. तीन महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे दुकानदारसुद्धा उसणवारीवर सामान देत नाहीत. या सर्व अडचणींमुळे येथील कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. या त्रासाला येथील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जाते. ज्या कर्मचाऱ्यांना कामे करता येत नाही, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)