शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सालेकसा तालुक्याची आरोग्य सेवा ऑक्सीजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

रुग्णालयात केव्हाही अपघाताचे रुग्ण भर्ती केले जातात. तसेच सामान्य रुग्ण त्यांनाही गरज पडल्यास भर्ती केले जाते. त्याचबरोबर प्रसूतीचे रुग्ण व इतर रुग्ण नेहमी या रुग्णालयात आपला औषधोपचार घेत असतात. परंतु या सर्वांसाठी एवढा मोठ्या रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर नियुक्त असून त्या एका डॉक्टराच्या भरवशावर संपूर्ण तालुक्यातील लोकांचा औषधोपचार अवलंबून राहिला आहे.

ठळक मुद्देएकाच डॉक्टरच्या भरवशावर औषधोपचार : रुग्णांची लागली रांग

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाची दहशत पसरली असून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच काही रुग्णांनी आपले प्राण ही गमावले आहे. अशात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी वाढत चालली आहे. परंतु सालेकसा तालुक्याची आरोग्य सेवा यावेळी सुद्धा ऑक्सीजनवर आलेली दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात कधीही मोठे आरोग्य संकट निर्माण होऊन संसर्गाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सालेकसा तालुक्यात एकूण ९२ छोटे-मोठे गावांचा समावेश असून या गावाची आरोग्य सेवा सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. या ग्रामीण रुग्णालयात नियमित दीडशे ते दोनशेच्या संख्येत बाह्यरुग्ण आपल्या आरोग्य तपासणीसाठी येत असतात. या शिवाय या रुग्णालयात केव्हाही अपघाताचे रुग्ण भर्ती केले जातात. तसेच सामान्य रुग्ण त्यांनाही गरज पडल्यास भर्ती केले जाते. त्याचबरोबर प्रसूतीचे रुग्ण व इतर रुग्ण नेहमी या रुग्णालयात आपला औषधोपचार घेत असतात. परंतु या सर्वांसाठी एवढा मोठ्या रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर नियुक्त असून त्या एका डॉक्टराच्या भरवशावर संपूर्ण तालुक्यातील लोकांचा औषधोपचार अवलंबून राहिला आहे.या वेळी येथील रुग्णसेवा व्हेंटीलेटरवर आलेली दिसत आहे. मात्र आरोग्य विभाग सालेकसा तालुक्याकडे कानाडोळा करीत आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.पी.एस.रामटेके यांना रुग्णालयाची संपूर्ण जवाबदारी पार पाडताना एकट्याला दिवसरात्र रुग्ण सेवा द्यावी लागत आहे. अशात त्यांनी आपले घरदार कुटूंब बाजूला ठेवून रुग्णालयातच वास्तव्य करीत २४ तास आरोग्य सेवा प्रदान करण्याची वेळ आली आहे. दररोज नियमित शेकडो रुग्णांची तपासणी व औषधोपचार करीत असतानाच दरम्यान तालुक्यात दररोज कुठे न कुठे अपघात होत असून त्या अपघाताच्या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात आणावे लागते. अशात डॉ. रामटेके यांना बाह्य रुग्ण तपासणी थांबवून अपघाताच्या रुग्णाकडे आधी लक्ष द्यावे लागते. एखादी प्रसूतीची महिला रुग्णालयात आली की परत तिच्यावर उपचार करण्यासाठी जावे लागते.आपातकालीन सेवा ही द्यावी लागतेसालेकसा तालुका हा तीन राज्याच्या सीमेवर असून या रुग्णालयात तालुक्यातील रुग्णासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्ण सुद्धा आपातकालीन औषधोपचार घेण्यासाठी केव्हाही पोहोचतात. अशात त्यांचा औषधोपचार डॉक्टर या नात्याने करावेच लागते. या व्यतिरिक्त एखाद्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची असेल तर याच डॉक्टरला धावून जावे लागत असते.कोरोना संसर्गाचे संकट वाढलेग्रामीण रुग्णालयात दररोज जवळपास ४०० लोकांचा औषधोपचार करावा लागत असून येथे मोठ्या गर्दीत रुग्ण लाईन लावून किंवा एकमेकांच्या सोबत शेकडो लोकांच्या संर्पकात येत आहेत. अशात एखादा कोरोनाग्रसीत रुग्ण आला तर शेकडो लोकांना कोरोनाचा संसर्ग होवून मोठा संकट निर्माण होऊ शकते.कोरोनाच्या उपचाराची सोय नाहीसंपूर्ण तालुक्याची भिस्त येथील ग्रामीण रुग्णालयावर असून एवढ्यात कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळल्यास त्याच्यावर औषधोपचार करण्याची कोणतीच सोय नाही. एकही लस सुद्धा येथे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. फक्त संशयितासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु तिथे सोय कोणतीच नाही. एवढ्यात संशयीत रुग्ण मिळाल्यास जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागेल.ग्रामीण रुग्णालयात एकूण चार डॉक्टरांचे पद मंजूर असून सध्या मला एकट्यालाच पूर्ण जवाबदारी सांभाळावी लागत आहे. संकटाच्यावेळी किमान एक डॉक्टरची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्याची गरज आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.-डॉ.पी.एस.रामटेके,ग्रामीण रुग्णालय सालेकसा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर