शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने घाव घालून केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे तीन घाव असताना ४ दिवसांपूर्वी रानडुकरामुळे किरकोळ जखमी झालेल्या मुनेश्वरचा खाटेखाली पडल्यामुळे मृत्यू झाला असावा असे त्याच्या पत्नीचे म्हणणे होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असता कुऱ्हाड कुठे होती, कुणी आणून ठेवली याची सखोल माहिती घेतली.  कुऱ्हाडीने घाव घातल्यावर कुऱ्हाडीला लागलेले रक्त धुऊन टाकण्यात आले. परंतु बेडवर रक्ताचा सडा आढळला असून या खुनामागे गूढ रहस्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम बघोली येथील मुनेश्वर सहेसराम पारधी (३२) या तरुणाला कुऱ्हाडीने घाव घालून ठार केल्याची घटना रविवारी (दि. २१) पहाटे ४ वाजतादरम्यान उघडकीस आली. खून झाला त्यावेळी मुनेश्वर व त्याची पत्नी एकाच खोलीत असताना या खुनासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही, असे मुनेश्वरच्या पत्नीचे म्हणणे आहे. हा खून पहाटे १.३० च्या सुमारास झाला असावा असा कयास लावला जात आहे.  घटनेची माहिती मिळताच गोंदियावरून श्वान व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.   मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे तीन घाव असताना ४ दिवसांपूर्वी रानडुकरामुळे किरकोळ जखमी झालेल्या मुनेश्वरचा खाटेखाली पडल्यामुळे मृत्यू झाला असावा असे त्याच्या पत्नीचे म्हणणे होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असता कुऱ्हाड कुठे होती, कुणी आणून ठेवली याची सखोल माहिती घेतली. कुऱ्हाडीने घाव घातल्यावर कुऱ्हाडीला लागलेले रक्त धुऊन टाकण्यात आले. परंतु बेडवर रक्ताचा सडा आढळला असून या खुनामागे गूढ रहस्य आहे. यापूर्वी दवनीवाडा पोलीस ठाण्यात केलेली विनयभंगाची तक्रार त्यातून वाढलेला तणाव हा तर खुनाला कारणीभूत नाही ना, या दिशेनेही दवनीवाडा पोलीस तपास करणार आहेत.  या खुनासंदर्भात दवनीवाडाचे ठाणेदार भोसले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आता तपास सुरू आहे, काही सांगता येत नाही असे बोलून खुनासंदर्भात बोलण्यास टाळले. तसेच संपूर्ण माहिती पुढे आल्यावर माहिती देऊ, असे ते म्हणाले. मुनेश्वरचे वडील पक्षाघाताने ग्रस्त आहेत. मुनेश्वरला ५ वर्षाची मुलगी व २ वर्षाचा मुलगा आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, तिरोड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांनी भेट दिली.­

एक ताब्यात- काही दिवसांपूर्वी कुणाल मनोहर पटले (२१) रा. बघोली याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दवनीवाडा पोलिसात दाखल करण्यात आला होता. त्याने वचपा काढण्यासाठी हा खून केला असावा, असा कयास लावून दवनीवाडा पोलिसांनी कुणाल पटले याला ताब्यात घेतले आहे. पोलिस आता त्याची कसून चौकशी करणार आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस