शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

घरगुती कारणातून गळा दाबून बायकोला केले ठार, खून करण्यापूर्वी सासऱ्याला केला फाेन; म्हणाला...

By नरेश रहिले | Updated: December 20, 2023 19:47 IST

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

गोंदिया : घरातील क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीची बचावाची झाल्याने नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजतादरम्यान सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम टोयागोंदी येथे घडली. आशा केवल नेवरा (३२, रा. टोयागोंदी) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपी केवल सितलाल नेवरा (३८, रा. टोयागोंदी) यांचा पत्नी आशा नेवरा यांच्यासोबत घरगुती कारणातून वाद झाला. या वादाला घेऊन असलेल्या रागात केवल नेवरा याने पत्नी आशा नेवरा यांचा गळा दाबून त्यांना ठार केले.

आशाचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. आशाला केवल पासून एक मुलगा ९ वर्ष व एक तीन वर्षाची मुलगी आहे. आशाही आठ दिवसापूर्वी माहेरी राहून १० डिसेंबर रोजी सासरी टोयागोंदी येथे आली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी केवलने आपले सासरे गोपाल सूरदेव निर्मलकर यांना फोन करून आशाला आठ-पंधरा दिवसांसाठी तुमच्याकडे पाठवत आहे, असे म्हटल्यावर कोणासोबत पाठवता, असे सासऱ्याने विचारले. बस्स.. मी पाठवतो असे बोलून केवल गप्प राहीला. त्यावर सासरा गोपाल निर्मलकर यांनी माझ्या मुलीला एकटी पाठवू नका; आपण सोडून द्या असे म्हटले. एवढे बोलल्यावर केवलने आशाला फोन दिला.

 गोपाल यांनी आशा सोबत चर्चा केल्यावर मला एकटीच माहेरी जायला सांगत आहेत आणि माझ्या मुलांनाही माझ्यासोबत पाठवत नाही असे आपल्या वडीलाला सांगितले. मुले कुठे आहेत हे विचारल्यावर त्या मुलांना सासू फिरायला घेऊन गेली असे आशाने सांगितले. त्यानंतर गोपाल यांनी फोन आपल्या पत्नी रमौतीन यांच्याकडे फाेन दिला. मायलेकीच्या बोलण्यातही मुलांसोबत पाठवतील तर मी माहेरी येईल अन्यथा मी माहेरी येणार नाही असे आशाने म्हटले. दुपारी ३:१५ वाजता आशाच्या सासऱ्याने नवीन नंबरने फोन करून आशाचा खून झाल्याची माहिती दिली. आशाचे माहेरचे मंडळी रात्री ९ वाजता टोयागोंदी येथे पोहचल्यावर दुपारी दीड वाजता आशाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पुढे आली. आशाचे वडील गोपाल सूरदेव निर्मलकर (६५, रा. उरई-डबरी, डोंगरगड- छत्तीसगड) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

सितलालच्या संवादातून त्यांच्या घरात वाद झाल्याचा संशयआशाचे सासरे सितलाल नेवरा यांनी आशाचे वडील गोपाल यांच्याशी फोनवर संवाद केला त्या संवादात नेवरा कुटुंबियांत वाद झाला असावा असा संशय घटनेच्या पूर्वीच गोपाल यांना आला होता. परंतु काही विचारणार यापूर्वीच आशाच्या सासऱ्याने फोन लगेच बंद केला. त्यामुळे आशाघरी काय घडले, कशामुळे जावई मुलीला माहेरी पाठविण्याची गोष्ट करतो हे काहीच कळले नाही. परिणामी खून झाल्याची बातमीच कानावर पडली.

सहा तासातच मुलीच्या खुनाची बातमीसकाळी ९ वाजता तब्बल १० ते १५ मिनीटे संवाद झाल्यानंतर त्यांच्या घरात वाद झाल्याची कुणकुण लागली. संवाद झाला, जावई ऐकेना, तिचा सासरा बोलेना, सासू लहान मुलांना घेऊन घराबाहेर गेली आणि आशाला अश्रृ आवरत नव्हते. या एकंदरीत प्रकरणावर वेळेनुसार प्रकरण शांत होईल असे माहेरच्यांना वाटत होते. परंतु तब्बल सहा तासाने मुलीचा खून झाल्याची बातमी कानावर पडली अन् माहेरच्या सर्व लोकांना अश्रृ अनावर झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस