शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

प्रत्येक आठवड्याला होतोय जिल्ह्यात महिलांचा छळ; गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:22 IST

घटनाही घडताहेत : महिला-मुलींच्या अपहरणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठी समस्या बनलेली आहे. यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही अधून-मधून घडत असतात. महिलांच्या बाबतीतील एकूण गुन्हे कमी झाले असले तरी अत्याचार व अपहरणाच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

देशभरात अत्याचाराच्या घटनांनी संताप व्यक्त होत आहे. या व्यवस्थेत महिलांना सुरक्षितता मिळत नाही. यातूनच नराधमांची वाकडी नजर महिला, मुलींवर पडत असल्याचे चित्र आहे. समाजात विकृती वाढत असून, संस्कारक्षम पिढी घडविण्यात कुठे तरी आपण कमी पडतो, हे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा जरब निर्माण करणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. सुरक्षित वातावरण देण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुनामध्ये लक्षणीय वाढ पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचे सत्र राबविणे सुरू केले तरीही खुनांचे गुन्हे वाढतच आहेत. जानेवारी ते आतापर्यंत १७ खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ४२ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हेगार निर्धावत आहेत पोलिसांकडून महिला अत्याचार विरोधातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होतो. यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरोधात अटकेची कारवाईही केली आहे. ही सकारात्मक बाब असली तरी यामुळे महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सातत्याने वाढत आहे. यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

कोण काय म्हणतंय.... "नारीशक्त्ती म्हणून स्त्रीचा गौरव केला जातो. दुसरीकडे मात्र तिच्यावर अत्याचार होतात. समाजातील विकृती दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांचा वचक नाही. सत्ताधाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही. महिलांना आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. लहान मुले, मुली, महिला सुरक्षित नाहीत."- ममता पाऊलझगडे, सामाजिक कार्यकर्ती, किडंगीपार

कौटुंबिक हिंसाचारात चार महिलांचा बळीसासरच्या मंडळींकडून विविध कारणाने छळ झाल्यामुळे विवाहित महिलेला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. या गुन्ह्यात त्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हे दाखल होतात. मागील वर्षी व यंदा सात महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारच्या आत्महत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा महिलांवरचा मोठा आघात होताना दिसत आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया