शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

माहेरून ८ लाख व दागिने आण म्हणत विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:54 IST

तालुक्यातील कामठा येथील प्रकरण : क्षुल्लक कारणावरून पतीला घरची मंडळी होती भडकवीत

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : माहेरून ८ लाख रुपये व सोन्याचे दागिने आण म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कामठा येथील दीपलता मनीष लिल्हारे (३४) यांनी रावणवाडी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. तेव्हापासून त्या कामठा येथे पतीच्या घरी राहत होत्या. तिचा पती दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने तो १२ मार्च २०२३ पासून दीपलता हिच्याशी भांडण व शिवीगाळ करून मारहाण करायचा. 

मनीष लिल्हारे हा दारूपाणी पिऊन दीपलताला माहेरून ८ लाख रुपये व सोन्याचे झुमके तुझ्या माहेरून घेऊन ये म्हणून तसेच घरगुती क्षुल्लक कारणावरून भांडण, मारपीट करून मानसिक त्रास व धमकी देत होता. सासू देवकी सुरेश लिल्हारे, भासरे कैलाश सुरेश लिल्हारे, विलास सुरेश लिल्हारे, जाऊ हेमलता कैलाश लिल्हारे, कविता विलास लिल्हारे हे सर्व माहेरून सोन्याचे झुमके व ८ लाख रुपये घेऊन ये म्हणून त्यांना त्रास देत होते. हे प्रकरण भरोसा सेलकडे गेल्यावरही तडजोड झाली नाही. परिणामी तक्रारीवरून २३ सप्टेंबर रोजी आरोपींवर भादंविच्या कलम ३२३, ३४, ४९८ (अ), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.

पहिल्या पत्नीपासून दोन बालके असल्याची माहिती लपविली आरोपी मनीष लिल्हारे याला पहिल्या पत्नीपासून दोन मूलबाळ आहेत ही माहिती लपविली होती. पती व त्यांच्या घरच्या लोकांच्या त्रासामुळे २७ जून २०२४ दीपलता माहेरी रतनारा येथे आली.

लग्नानंतर दोन वर्षे चांगली वागणूक लग्नानंतर पती मनीष लिल्हारे हा दोन वर्षापर्यंत चांगला राहिला. त्यानंतर दारूपाणी पिऊन भांडण व मारपीट करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. आरोपी पतीला त्याचे घरचे लोक सासू देवकी, भासरा कैलाश, भासरे विलास, जाऊ हेमलता, लहान जाऊ कविता हे सहकार्य करीत असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाdowryहुंडा