मदतीची मागणी : अनेकांना केले जखमी शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा (कोयलारी) येथे सतत दोन दिवस गावात शिरून रानडुकराने हैदोस घातला आहे. अनेकांना जखमी करून रानडुकर सैरावैरा पळत असतात. यात जिवीतहाणी झाली नाही. सविस्तरवृत्त असे की, जुलैच्या पहाटे एक रानडुक्कर गावातील लेमनदास लिल्हारे यांच्या वाडीत शिरला. एवढ्यातच आरडाओरड झाली. तो पळताना माजी उपसरपंच पिसाराम सोनवाने यांच्या पत्नी पारबता सोनवाने (५०) हिला जोरात धक्का दिला. एवढ्यातच ती खाली पडली व जखमी झाली. याची माहिती वनरक्षक मोहतुरे यांना देण्यात आली. परंतु चौकशी झाली नसल्याने समजले. परंतु दुसऱ्या दिवशी पहाटेला रानडुक्कर गावात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावात रानडुकर दिसल्याने गावकऱ्यांनी आरडा ओरड केली. यात तो पळून गेला. रानडुक्कर हा हिंस्त्र प्राणी आहे. गावाला लागून जंगल असल्यामुळे हिंस्त्र प्राणी गावाच्या आडोशाला येतात. गावालगत असलेल्या शेतातील पिकाचे नेहमीच नुकसान करीत असतात. एखाद्यावेळी कोणताही वन्यप्राणी अचानक दगावल्यास विनाकारण गावकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येते, असे लोकांचे म्हणणे आहे. वनविभागाने जंगलासोबत वन्यप्राण्यांच्या क्षेत्रात काटेरी कुंपन करून त्यांना गावात अथवा शेतात येण्यापासून रोखण्याचा काम करणे आवश्यक आहे. वनविभागाच्या उदसिनतेमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. वन्यप्राणी गावाकडे धाव घेऊन नागरिकांना नुकसान पोहचवितात. वानरही घरांवर उड्य मरतात.त्यामुळे कवेलूंचे मोठे नुकसान होते. मात्र वनविभाग त्या नुकसानग्रस्तांना मदत देत नाही. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेंडा/कोयलारी परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
शेंडा येथे रानडुकरांचा हैदोस
By admin | Updated: August 3, 2014 00:11 IST