शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या गोंदिया शहराला होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:40 IST

जुनी पाइपलाइन जीर्ण : शहरवासीयांची मजिप्राकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्ध्या शहराला गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर पंधरा ते वीस दिवसांनी गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने शहरातील नळ कनेक्शनधारक त्रस्त झाले आहेत.

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात जवळपास १२ हजारांवर नळ कनेक्शनधारक असून, त्यांना प्रति व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही काही भागांत जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून बरेचदा गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. ही पाइपलाइन १९७२ मध्ये टाकण्यात आली आहे. 

त्यामुळे ती आता बदलण्याची गरज आहे. तर काही भागांतील पाइपलाइन ही नवीन टाकण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील शास्त्री वॉर्ड, सिव्हिल लाईन, छोटा गोंदिया यासह इतर भागांतील नळ कनेक्शनधारकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग आणि इतर कामांसाठी सुद्धा वापरण्यायोग्य नाही. त्यामुळे नळ कनेक्शनधारकांना खासगी विहिरी आणि बोअरवेलवर धाव घ्यावी लागत आहे. नळ कनेक्शनधारकांनी याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सुद्धा तक्रार केली आहे.

नवीन योजना कार्यान्वित होईपर्यंत समस्याशहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन २३७ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच पाणी टाक्या आणि पाइपलाइन बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूक