शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

ई-मेल हॅक करून क्रेडिट कार्ड बनविले, ३५ लाखांचे कर्ज उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 17:33 IST

१३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल : ४ लाखांचे उत्पन्न असताना दाखविले ९४ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तरुणाचे आधार कार्ड, पैन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून क्रेडिट कार्डच्या आधारावर तरुणाच्या नावावर ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्या रकमेतून सोने व इतर साहित्य आरोपींनी घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह या कामात सहभागी असणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १५ नोव्हेंबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान हा प्रकार करण्यात आला. 

आमगाव तालुक्यातील शिवजीनगर बनगाव येथील विजय कुशन कोरे (३३) या तरुणाचे उत्पन्न ४ लाख ८० हजार असताना आरोपींनी ९४ लाख रुपये त्याचे उत्पन्न दाखवून त्याच्या नावावर ३७ लाखांच्या कर्जाची उचल विविध बँकेतून केली. त्यांचा मोबाइल व ई-मेल आयडी हॅक करून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी ३५ लाखांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्या रकमेतून सोने व इतर साहित्य खरेदी करून विजय कोरे यांच्या नावाने बिल तयार केले. आयटीआर चुकीच्या पद्धतीने रिव्हाइस करून त्यांची ९४ लाखांचे उत्पन्न दाखवित कर्जाची उचल केली. 

विजय कोरे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने आमगाव येथील न्यायालयाच्या आदेशावरुन आमगाव पोलिसांनी १३ आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ४२३, ४६४, ४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरूपती राणे करीत आहेत. 

आरोपींमध्ये यांचा समावेश या प्रकरणात आरोपी मनोज हिरालाल जुनघरे, रा. गोकुल नगर गडचिरोली, निखिलकुमार नरेंद्रसिंह कोसले रा. कमल विहार ४ रायपूर (छत्तीसगड), मंगेश लालाजी दुर्गे, रा. गोकुळनगर गडचिरोली, विकीसिंग नरेंदसिंग कोसले (५७) कमल विहार सेक्टर ८ रायपूर, नीलेश लोकेश सुनहरे रा. कमल विहार सेक्टर ८ रायपूर, संगीतासिंग कोसले रा. सी ५७ कमलीवार सेक्टर रायपूर छत्तीसगड, आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड कंपनीमधील अधिकारी व इतर अधिकारी अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमgondiya-acगोंदिया