शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

गुरुजींचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचावे

By admin | Updated: February 4, 2015 23:16 IST

गुरुजींनी भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना केली. परंतु त्यांचे कार्य फक्त या संस्थेपर्यंतच मर्यादीत नव्हते. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार नवीन पिढीपर्यंत व्हावा व कर्तृत्ववान

आमगाव : गुरुजींनी भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना केली. परंतु त्यांचे कार्य फक्त या संस्थेपर्यंतच मर्यादीत नव्हते. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार नवीन पिढीपर्यंत व्हावा व कर्तृत्ववान पिढी निर्माण व्हावी असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी प्रतिपादन केले. बुधवारी (दि. ४) शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. राजेश काशिवार, सत्कारमुर्ती राकेश शर्मा, नामदेव कापगते, मुकेश थानथराटे, भाऊराव उके, लक्ष्मण नाईक, श्रीराम बावनकर, माजी आमदार केशव मानकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक स.रं. अंजनकर, ढे.र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मिला कावळे, लक्ष्मी नागपुरे, जयंती समारंभाचे संयोजक, डॉ. डी.के. संघी, प्राचार्य श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य एस.सी. हनुवते, कार्यकारी प्राचार्य ए.यु. बन्सोड उपस्थित होते. गुरुजींच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्निकच्या कार्यशाळेचे उद्घाटन व भवभूती महाविद्यालयाच्या आवार भिंतीचे भूमिपूजन खा. नेते यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शिक्षण, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सत्कारमुर्तींचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना संघी परिवारातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उद्घाटनपर भाषणात खासदार नेते यांनी युवकांना दुरदृष्टी, सहनशिलता व जिद्द हे तीन मंत्र जोपासण्याचे आवाहन केले. संचालन प्रा. उमेश मेंढे, प्रा. तोषीका पटले, शोभा येळे, अश्विनी जोशी, दिनेश राऊत यांनी केले. आभार डॉ. संघी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)