शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची होणार पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

गैरप्रकारातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींनी देव पाण्यात ठेवले आहेत. सर्व शाळांमधील १३ फेब्रुवारी २०१३नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शिक्षकांच्या सर्व तपशिलासह टीईटी प्रमाणपत्राची मूळ प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्गांवर १३ फेब्रुवारी २०१३नंतर नियुक्त शिक्षकांची माहिती तसेच टीईटीच्या मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश राज्य परीक्षा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गुरूजींची पडताळणी होणार आहे. त्यामुळे गैरप्रकारातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींनी देव पाण्यात ठेवले आहेत. सर्व शाळांमधील १३ फेब्रुवारी २०१३नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शिक्षकांच्या सर्व तपशिलासह टीईटी प्रमाणपत्राची मूळ प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागवली आहे.

पुण्याला ३२ प्रमाणपत्र पडताळणीसाठी जाणार- शिक्षकांकडून मिळालेली कागदपत्रे अचूक असल्याची पडताळणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना करायची आहे. भविष्यात यासंबंधी काही प्रकरण उद्भवल्यास जबाबदारी निश्चितीही शिक्षण विभागाने केली. जिल्हा परिषदेंतर्गत १७ तर खासगी शाळांतील ७ व माध्यमिक शिक्षण विभागातील ८ अशा ३२ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पुण्याला पाठविली जाणार आहेत.

...तर शिक्षकांवर कारवाई- या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास ती माहिती राज्य परीक्षा परिषदेला दिली जाईल. त्यानंतर शिक्षकांवर कारवाई केली जाईल. जे शिक्षक टीईटी मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन देण्यात येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. यामुळे काही गुरुजींची झोप उडाली आहे.

कशामुळे होतेय पडताळणी? - परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी पैसे घेऊन गुण वाढविल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. - अशाप्रकारे पात्र ठरून कुणी शिक्षक नोकरीला लागले का, याचा शोध परीक्षा परिषदेकडून घेतला जात आहे. nत्यासाठी मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आयुक्तांनी कागदपत्र पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत.

 

टॅग्स :Teacherशिक्षक