शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

28 जूनपासून गुरुजींची शाळेत हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यात पहिली ते नववीच्या एकूण १०३९ शाळा असूृन ८८०० शिक्षक आहेत. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुध्दा पूर्ण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक सत्राला होणार ऑनलाईनने सुरुवात : शिक्षण विभागाने केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. आता सर्वत्र संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहार सुरळीत होत आहे. त्यातच शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि दहावी ते बारावीचे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइनच वर्ग सुरु होणार असून गुरुजींना शाळेत हजेरी लावावी लागणार आहे. जिल्ह्यात पहिली ते नववीच्या एकूण १०३९ शाळा असूृन ८८०० शिक्षक आहेत. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुध्दा पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्याने काही दिवस विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले जाणार आहे. यंदा नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव घरूनच होणार आहे. मागील वर्षीचे शैक्षणिक वर्षही कोरोनाच्या संक्रमणामुळे वाया गेले. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले आहे. असे असले तरी पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या. विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू होणार आहेत. सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थितीत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे शिक्षण संचालकांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. विद्यार्थी, शिक्षकांची ओळख आभासीच उन्हाळी सुट्ट्यांनंतर २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे. गतवर्षीही टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा आनंद घेता आला नाही. यंदाही शिक्षक आणि विद्यार्थी यांची तोंडओळख आभासीच करून घ्यावी लागणार आहे.

उजळणीने होणार सुरुवात शिक्षण विभागाने जारी केलेल्या सूचनांनुसार यंदाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी याबाबत कोणत्याही सूचना करण्यात आल्या नाही. शैक्षणिक सत्रासंदर्भात कोणताही आराखडा स्पष्ट करण्यात आला नसल्याची खंत मुख्याध्यापक वर्गाकडून व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘बिज कोर्स’ उपक्रमजिल्हा परिषदेच्या ८०० शाळा विलगीकरणासाठी देण्यात आल्या होत्या. सर्व शाळा स्वच्छ करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शिक्षक गृहभेटी देतील. शासनाच्या आभासी शिक्षण देण्याच्या सूचना असल्या तरी जिल्ह्यात ही प्रणाली यशस्वी नाही. त्यासाठी बिज कोर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांच्या तीन टप्प्यात प्रथम शिक्षण देण्यात येणार आहे. या अनुषंगाने त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येणार असल्याचे गोंदिया जि.प. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक