लोकमत न्यूज नेटवर्कसोनपुरी : सालेकसा पंचायत समिती अंतर्गत अभिनव केंद्र सोनपुरीची तिसरी केंद्र शिक्षण परिषद नवेगाव येथील जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेत घेण्यात आली.शिक्षण परिषदेची सुरुवात गरबा नृत्यातून करण्यात आली. सर्व शिक्षकांनी गरबा नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यानंतर दोन गटात शिक्षण परिषद घेण्यात आली.अभिनव उपक्रशील केंद्रप्रमुख एच.पी. पटले यांच्या मार्गदर्शनात वर्ग १ ते ५ आणि वर्ग ६ ते ८ पर्यंत गट पाडण्यात आले. दोन्ही गटात गणित भाषा (हिंदी, इंग्रजी) तंत्रज्ञान आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.पहिला गटात एम.एम. राजगिरे, वैभव पिट्टलवार, के.डी. नवगोडे, सुरेश चव्हाण, रत्नशिल गजभिये यांनी मार्गदर्शन केले.दुसऱ्या गटात कबीर माहुले, राजेश वट्टी, पी.जी. सोनवाने, व्ही.एस. मानकर, एस.पी. बैठवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी केंद्रप्रमुख पटले यांनी अध्ययन स्तर निश्चिती, नॅस परीक्षा, आपत्ती निवारण व्यवस्थापन, चित्रकला व निबंध स्पर्धा विषयी मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेला वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.एल. मेश्राम, एन.पी. चिखलोंढे यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. त्यांनी गुणवत्तास्तर उंच कशा उठवता येईल या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाकरिता मुख्याध्यापक आर.एस. सोनवाने, एस.एम. दसरिया, के.डी. नवगोडे, आर.एस. वानखेडे, आर.जी. टेकाम, आर.एस. बसोने, पी.एम. ढेकवार, व्ही.एस. येशनसुरे आदिंनी सहकार्य केले.
शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:36 IST
सालेकसा पंचायत समिती अंतर्गत अभिनव केंद्र सोनपुरीची तिसरी केंद्र शिक्षण परिषद नवेगाव येथील जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेत घेण्यात आली. शिक्षण परिषदेची सुरुवात गरबा नृत्यातून करण्यात आली.
शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन
ठळक मुद्देतिसरी शिक्षण परिषद : गणित, भाषा व तंत्रज्ञानावर मार्गदर्शन