शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:50 IST

सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद व नगर परिषद शाळेत समविचार : शिक्षण विभागाचा उपक्रम

हितेश रहांगडाले ।ऑनलाईन लोकमतवडेगाव : सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ पासून गोंदिया जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाचे फलीत झाले. गुढीपाडवा या एकाच दिवशी जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतले होते. या उपक्रमाला मिळत असलेला व्यापक प्रतिसाद पाहता तो यंदा देखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शिक्षण विभाग यासाठी कामाला लागला आहे. अधिकाधिक विद्यार्थी शाळेत दाखल व्हावेत याकरिता जिल्ह्यातील शाळा सक्रियपणे कामाला लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या १०६९ शाळांसह जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या २२ शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार गोंदिया व तिरोडा नगर परिषद शाळांमध्ये सदर उपक्रम राबवून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सदर उपक्रम सुरु झाल्यापासून जि.प. शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थी पटसंख्या वाढतच आहेत. उपक्रम सुरु होण्यापुर्वी जिल्ह्यात इयत्ता पहिलीतील प्रवेशिका विद्यार्थी संख्या सत्र २०१४-१५ मध्ये सुमारे ३७००, त्यानंतर उपक्रमाचे फलीत मिळून २०१५-१६ मध्ये १०,१२० विद्यार्थी, २०१६-१७ मध्ये ११९५२ विद्यार्थी तर २०१७-१८ या सत्रात सुमारे १३००० विद्यार्थ्यांनी जि.प. शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेला आहे. गुढीपाडवा उपक्रम राबविण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना सजविलेल्या गाडीवर वाजत-गाजत मिरवणूक, लेझीम भजन दिंडीद्वारे शाळेत आणण्यात येणार आहे. उपक्रम अधिक यशस्वी व परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या कल्पकतेने भर घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान याप्रसंगी प्रदीर्घ कार्यक्रम, भाषणे, कंटाळणाऱ्या बाबी टाळून उपकम मनोरंजक बनविण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.पालकांचा करणार सत्कारविद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या यशोगाथा सांगून पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेत सकाळी शिक्षणाची गुढी उभारुन त्याचे महत्व जनसामान्यांना पटवून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सदर उपक्रम यशस्वी राबवून १०० टक्के पटनोंदणी व उत्कृष्ट कार्य करणाºया शाळा व शिक्षकांचा सन्मान शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.डीआयईसीपीडीची चमू दिमतीलागोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळात विद्यार्थी प्रवेश वाढविण्यासाठी गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा यासारखे यशस्वी उपक्रम सुरु असताना गोंदिया जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआईसीपीडी) गोंदियातर्फे शैक्षणिक सत्र २०१८-१९ करीता सर्व दाखल पात्र मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दाखलपात्र मुलांनी माहिती मागून दाखल करण्यात येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष सोडविण्यासाठी संस्थेची चमू प्रत्यक्षात मदतीला येणार आहे.अभिनव उपक्रमाचे कौतुकगुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाची प्रेरणा देणारे गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सलग तीन वर्षापासून सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.तसेच अशाच अभिनव उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा