शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पालकमंत्र्यांची बसस्थानकाला ‘फ्लार्इंग व्हिजीट’

By admin | Updated: June 13, 2017 00:56 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी (दि.११) येथील राज्य परिवहन विभागाच्या बसस्थानक व डेपोला आकस्मिक भेट दिली असता,

भेटीत आॅनड्युटी कर्मचारी झोपेत : अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी (दि.११) येथील राज्य परिवहन विभागाच्या बसस्थानक व डेपोला आकस्मिक भेट दिली असता, येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान येथील सुरक्षारक्षक आॅन ड्युटी गाढ झोपेत असल्याचे निदर्शनास आले. नामदार बडोले आल्याचे सांगण्यात आल्यावर त्या सुरक्षारक्षकांची झोपच उडाली. तर बसथानकाच्या पाहणीदरम्यान येथे समस्यांचा अंबारच दिसून आल्याने एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी झाडाझडती घेत त्यांना धारेवर धरले. लोकवाहिनी म्हणून एस.टी.ची ओळख आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून गोंदिया आगारातून दररोज १० हजार नागरिक प्रवास करतात. मात्र येथील बसस्थानकावर सोई-सुविधांची वाणवा आहे. एवढ्या मोठ्या बसस्थानकात फक्त दोनच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सफाईची धुरा असल्याने योग्यरितीने येथे स्वच्छता केली जात नाही. येथे असलेल्या हिरकणी कक्षात सुविधांचा अभाव दिसून आला. बसस्थानकातील उपहारगृहाचे बांधकाम ३ वर्षापूर्वी झाले. मात्र अद्याप त्याची निविदा काढून कंत्राट कुणालाही देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.याबाबत आगारप्रमुखांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. तर उपहारगृहाच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी चक्क गाढ झोपेत असल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर, मराठी भाषा गौरवाचा फलक फाटक्या अवस्थेत पालकमंत्र्याना दिसून आल्याने येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सफाई कर्मचाऱ्यांवर बसस्थानक व परिसराची सफाई करण्याची जबाबदारी असताना ते योग्य पध्दतीने काम करीत नसल्याचे आढळून आले. तर एच.आर.पटले हे आपल्या ड्युटीदरम्यान गाढ झोपेत असल्याचे दिसून आले. त्यात बसस्थानक परिसरात असलेल्या महिला व पुरुष शौचालयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. येथील डेपोमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. प्रवाशांच्या सुविधांसंदर्भात एकही व्यवस्था बसस्थानक परिसरात नसल्याचे पालकमंत्र्यांच्या पाहणीत आढळून आले. दरम्यान पालकमंत्र्यांनी आगारप्रमुखांची कानउघाडणी करीत प्रवाशांच्या सुविधांसाठी व जागेच्या वापराच्या नियमाप्रमाणे व्यावसायिक वापर करण्याचे निर्देश दिले. सोबतच आगाराच्या उत्पन्न वाढीसाठी त्वरीत कारवाई करण्यास सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांसोबत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, भाजप नेते विरेंद्र जायस्वाल, न.प.सदस्य घनश्याम पानतवणे, भरत क्षत्रिय, प्रदीप ठाकूर व इतर उपस्थित होते. गोंदिया आगारात तब्बल ८० पदे रिक्त गोंदिया आगारात गेल्या अनेक वर्षापासून तब्बल ८० पदे रिक्त असून त्यात चालक २३, वाहक ३२, यांत्रिक १७, लिपीक ५, वाहतुक निरीक्षक २, शिपाई १ यांचा समावेश आहे. पदे रिक्त असल्यामुळे दुसऱ्यांच्या कामांचा ओझा येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करीत असल्याचे चित्र आहे. परिवहनमंत्र्यांशी चर्चा करुन समस्या सोडवू गोंदिया एस.टी.बसस्थानक व डेपोला आकस्मिक भेट दिली असता, अनेक समस्यांचा अंबार दिसून आला. स्वच्छतेसोबत प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा वेगळा होऊन १८ वर्षाचा कालखंड होऊनसुध्दा भंडारातून जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष वेगळे करण्यात आले नाही. सोबतच येथील आगारात ८० पदे रिक्त आहेत. या सर्व समस्यांबाबत आपण राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून रिक्त पदे व येथे असलेल्या समस्या नक्की सोडवू. -राजकुमार बडोले,पालकमंत्री गोंदिया जिल्हा