शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात मधमाशांच्या हल्ल्यात पालकमंत्री राजकुमार बडोले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:17 IST

राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसरातील वन्यजीव विभागाच्या लॉगहट विश्रामगृहातील मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविश्रामगृहात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसरातील वन्यजीव विभागाच्या लॉगहट विश्रामगृहातील मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार पालकमंत्री बडोले हे अर्जुनी-मोरगाव येथे १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी येथील लॉगहट विश्रामगृहात आले होते. या संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संमेलनाच्या यशस्वी आयोजन व समित्यांची स्थापना करण्यासाठी भाजपच्या वतीने विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलविली होती. पालकमंत्री विश्रामगृहाच्या वºहांड्यात बसून आढावा घेत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. कार्यकर्ते सैरावरा पळायला लागले. पालकमंत्री बडोले, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव समीर बन्सोडे, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांना मधमाशांनी चावा घेतला. पालकमंत्री या विश्रामगृहावर येणार हे माहित असताना सुध्दा एक वनरक्षक उके व चौकीदार जगदीश मेश्राम यांच्या व्यतिरिक्त कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्लानंतर ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) नागपूर कार्यालयात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत कार्यशाळा असल्यामुळे उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्राधिकारी यावेळी उपस्थित नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात