शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग १ ते ७ वी च्या शाळा सुरू करण्यास ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सोमवारपासून (दि.१४) जिल्ह्यात वर्ग पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राजेश खवले यांनी घेतला आहे; परंतु कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहे. त्यांतर्गत, शाळा दररोज ३ ते ४ तास घेण्यात यावी, पटसंख्या अधिक असलेल्या शाळांनी १ दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत इयत्ता १ ते ७ वीच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याने  वर्ग १ ते ६ पर्यंतच्या शाळा सोमवारपासून (दि.१४) फेब्रुवारीपासून सुरू करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. जिल्ह्यात ८ वी ते १२ वी चे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा अद्याप बंद आहेत. विशेष म्हणजे, अन्य जिल्ह्यांत शाळा सुरू झालेल्या आहेत. अशात आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने सोमवारपासून (दि.१४) जिल्ह्यात वर्ग पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राजेश खवले यांनी घेतला आहे; परंतु कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहे. त्यांतर्गत, शाळा दररोज ३ ते ४ तास घेण्यात यावी, पटसंख्या अधिक असलेल्या शाळांनी १ दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे. ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑफलाईन व उरलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाळी-पाळीने शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालकांकडून त्यांच्या पाल्यांना शाळेत येण्यासंबंधाने संमतिपत्र लिहून द्यावे लागणार आहे.

सर्वांना मास्क आवश्यक- सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याला ताप आणि उलटी येत असेल तर त्वरित कोविड तपासणी करणे बंधनकारक राहील. मैदानातील खेळ, स्नेहसंमेलन, परिपाठ यासारखे गर्दीचे कार्यक्रम खुल्या जागेच्या ठिकाणी २५ टक्के व बंदिस्त सभागृहात आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने कोविड नियमावलीचे पालन करून आयोजित करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप असल्यास शाळेत येण्यास सक्ती करण्यात करता येणार नाही. लसीचे दोन्ही डोस बंधनकारक- सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा स्तरावर काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे.  शिक्षक व विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅण्डवॉश स्टेशन उभारायचे असून विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करण्याबाबत सूचना द्यायच्या आहेत. हात धुण्याकरिता साबण उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता नेहमी पाळण्यास आवाहन करायचे आहे. विद्यार्थ्यांनी सोबत पाणी बॉटल आणावी लागेल.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या