शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

ग्रामसेवकांना ‘शो कॉज’

By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST

विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना ‘शो कॉज’ नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती

गोंदिया : विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना ‘शो कॉज’ नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही नोटीस दिल्याची माहिती आहे. यामुळे आंदोलनात सहभागी जिल्हयातील सुमारे ३३५ ग्रामसेवक अडचणीत येण्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रुटी दूर करणे, ग्राम पंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, २० ग्राम पंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे २ जुलै पासून राज्यस्तरावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३३५ ग्रामसेवक सहभागी असून त्यांनी ग्राम पंचायतला कुलूप ठोकून कक्ष अधिकाऱ्यांना चाब्या दिल्या होत्या. यामुळे ग्राम पंचायतींचे कामकाज विस्कटल्याने नागरिकांची ओरड सुरू होती. ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना त्यांच्या या कृत्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशावरून खंडविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना नोटीस पाठविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आंदोलनात सहभागी असलेल्या ग्रामसेवकांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ग्रामसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष कार्तिक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नोटीस देण्यात आल्याचे सांगीतले. तर संघटनेचे तालुकाध्यक्ष रूद्रकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या बाहेर असून अद्याप पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)