शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
2
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
4
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
5
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
6
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी
7
‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश
8
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
9
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
10
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
11
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
12
विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!
13
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान
14
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
15
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
16
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
17
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन
18
IPL 2025 : चहल ठरला PBKS च्या 'ब्लॉकबस्टर' शोचा हिरो! प्रीतीनं गळाभेट घेत थोपटली फिरकीपटूची पाठ
19
ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”
20
IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली आहे चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 21:18 IST

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे.  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी  करण्यास सुरुवात केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक  कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे.  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी  करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली  तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या  नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची  निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर  झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. 

१८ डिसेंबरला होणार मतदान ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नाेव्हेंबर ते २ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी १८ डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर २० डिसेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे.निकालासाठी करावी लागणार दोन दिवस प्रतीक्षानिकालासाठी करावी लागणार दोन दिवस प्रतीक्षा जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे गावचा पुढारी आणि सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भूमिपूजन व राजकीय कार्यक्रमांना ब्रेक - निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या तारखेपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा,  बैठका, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. मंडई उत्सवातून संपर्क- जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. सध्या मंडई उत्सव जोरात सुरू असून याच दरम्यान  ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने मंडई उत्सवाच्या माध्यमातून भावी उमेदवार जनसंपर्क वाढवित असल्याचे चित्र  ग्रामीण भागात दिसून येत आहे. भाऊ रामरामला झाली सुरुवात - ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भावी उमेदवारांनी भाऊ रामराम म्हणण्यास सुरुवात झाली आहे. कधी रामराम न घेणारे आता आर्वजून रामराम घेत आहेत.भावी उमेदवार ॲक्टिव्ह मोडवर- ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य  पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात  ग्रामपंचायत  क्षेत्रातील मतदारांच्या याद्या घेण्यासाठी भावी उमेदवारांची गर्दी दिसून आली. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक