सडक-अर्जुनी : कबड्डी हा भारतीय मातीतला खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी ताकत, हिंमत, कौशल्य लागते. प्रो कबड्डी सामन्यामुळे आज भारतातच नव्हे तर ग्रामीण भागातील खेड्यापर्यंत कबड्डी खेळ खेळला जातो. कबड्डी खेळाला आज चांगले दिवस आले आहे, असे विचार आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी बक्षीस वितरणप्रसंगी व्यक्त केले.
गोंडवाना स्पोर्टिंग क्लब सडक-अर्जुनीच्या सौजन्याने भव्य ओपन कबड्डी स्पर्धा दिवस व रात्रकालीन नगरपंचायतजवळ शेंडा रोड सडक-अर्जुनी येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, मुख्याध्यापक राजकुमार हेडाऊ, भरत मडावी, मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम, कर अधिकारी निहाल नायकवाडी, यशवंत कावळे, भोजराज रामटेक, ज्ञानेश्वर पर्वते उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मोहाडी येथील विद्युत क्रीडा मंडळाने प्राप्त केला. मंडळाला २२ हजार २२२ रुपये रोख बक्षीस देण्यात आले. तर द्वितीय क्रमांक गोंदिया येथील चमू संत गाडगेबाबा त्यांना १५ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांक शेंदुरवाफा चमूने पटकावला. ११ हजार १११ रुपये तर चतुर्थ पारितोषिक ७ हजार ७७७ रुपये गोंडवाना स्पोर्टिंग क्लब सडक-अर्जुनी यांनी प्राप्त केला. स्पर्धेसाठी आशीष येरणे, राजू पटले, तुकाराम राणे, महेंद्र वंजारी, राजेश शेंडे, महेश डुंबरे, ओमेश कापगते, बिरला गणवीर, प्रीतम शहारे, सुमित येरणे, बोरकर, बी.जे. येरणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजकुमार भगत यांनी केले तर आभार राजेश कटरे यांनी मानले. कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष अक्षय लांजेवार, क्रीडा प्रमुख शुभम येरणे तसेच लक्ष्मण उईके, नीरज मडावी, तिलेश मडावी, कैलास पंढरे, गुलशन जुळा, शुभम आचले, दीपक पंदरे, लोकेश उईके, विनय वाढीवे, रवींद्र चिचाम, मयूर पुराम, अतुल सोळी, राहुल पंदरे, संकेत राऊत, मुकुंदा मसराम, रोशन गहाणे, अनिकेत भरे, हरीश वाघाये यांनी सहकार्य केले.