शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात सेल्फीच्या नादात दोन तरुणींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:39 IST

बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनर्सिंगचे प्रशिक्षण घेत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाघ नदीच्या पात्रालगत मैत्रिणीसह सेल्फी घेताना पाय घसल्याने दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही तरुणींचे मृतदेह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले.मेघा सुखदेव शहारे (२१) रा.खमारी व समता कन्हैयालाल न्यायकरे (२०) रा. गिरोला दासगाव अशी मृत तरुणींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार गोंदियाच्या मरारटोली येथील युवा परिवर्तन संस्थेत नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या समता न्यायकरे, मेघा शहारे यांच्यासह त्यांच्या मैत्रिणी वर्ग सुटल्यानंतर बाघ नदीच्या कोरणी घाटावर फिरायला गेल्या होत्या. समता व मेघा नदीच्या काठावर एका दगडावर उभ्या राहून सेल्फी घेत होत्या.सेल्फी घेतांना दोघींचाही पाय घसरल्याने त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या. दूर उभ्या असलेल्या त्यांच्या मैत्रिणीनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. मात्र नदीत पाणी अधिक असल्याने त्यांचा शोध वेळीच घेता आला नाही.घटनेची माहिती गोंदियाचे तहसीलदार भंडारी व रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही विद्यार्थिनीचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूची मदत घेण्यात आली. या घटनेमुळे खमारी व गिरोला गावात शोककळा पसरली आहे. रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

धोकादायक स्थळी सेल्फी घेणे टाळाअलीकडे तरुणी-तरुणींमध्ये सेल्फी घेण्याची क्रेज प्रचंड वाढली आहे. नदीच्या काठावर व धरणाजवळ सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. यानंतरही याबाबत युवक-युवती धडा घेत नसल्याचे दिसते. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे असा बोर्ड बाघ नदीच्या पात्रालगत सुध्दा लावण्यात आला आहे. मात्र यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यू