शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

छत्तीसगडच्या मूर्तिकारांना गोंदियाची ओढ

By admin | Updated: August 12, 2014 00:00 IST

मूर्त्या व देखाव्यांसाठी छत्तीसगड, तर गणपती व दुर्गा उत्सवासाठी गोंदियाची दूरवर ख्याती आहे. गोंदियात या उत्सवासाठी मोठ्या संख्येत मूर्त्या छत्तीसगड राज्यातूनच आणल्या जातात.

कपिल केकत - गोंदियामूर्त्या व देखाव्यांसाठी छत्तीसगड, तर गणपती व दुर्गा उत्सवासाठी गोंदियाची दूरवर ख्याती आहे. गोंदियात या उत्सवासाठी मोठ्या संख्येत मूर्त्या छत्तीसगड राज्यातूनच आणल्या जातात. त्यामुळेच गोंदिया व छत्तीसगड राज्याची नाळ जुळलेली आहे. परंतू आता छत्तीसगडच्या मूर्तिकारांनीच गोंदिया गाठून गोंदियाच्या चितारओळीत ठाण मांडले आहे. गोंदियाची ख्याती आता छत्तीसगडच्या मूर्तीकारांना खेचून आणत असल्याचे यातून सिद्ध झाले.गोंदियाच्या गणपती व दुर्गा उत्सवाची ख्याती लगतच्या परिसरातच काय पण लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यापर्यंत पोहोचली आहे. यामुळेच या दोन्ही उत्सवाची भव्यता व चमकधमक बघण्यासाठी येथून नागरिकांचे जत्थे गोंदियात येत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. यामागची विशेषता म्हणजे गोंदियावासीयांची श्रद्धा तर आहेच मात्र आकर्षक मूर्त्या व देखावे त्यात अधिकची भर घालणारे ठरतात. छत्तीसगड राज्यातील दुर्ग, राजनांदगाव, भिलाई, रायपूर या भागात तयार होणाऱ्या मूर्त्यांनी गोंदियावासीयांना भूरळ घातली आहे. यामुळेच येथील सार्वजनिक उत्सव मंडळ मोठ्या संख्येत छत्तीसगड राज्यातून मूर्त्या मागवितात. मूर्त्या काय तर येथील देखावे, झाक्या व रोषणाई सुद्धा प्रसिद्ध असल्याचे छत्तीसगडची गोंदियात चांगलीच डिमांड असून पावले आपोआप छत्तीसगडकडे वळतात. याचेच फलीत आहे की, गोंदियाच्या उत्सवाची ख्याती वाढतच चालली आहे. मात्र याचा परिणाम असा होत आहे की, आता गोंदियाच्या उत्सवाची ख्याती ऐकून छत्तीसगडमधील मूर्तीकार गोंदियाची वाट धरू लागले आहेत. याचे मूर्त उदाहरण येथील सिव्हिल लाईन माता मंदिर चौकात बघावयास मिळाले. शहरात मूर्त्यांसाठी सध्या सिव्हिल लाईन परिसर प्रसिद्ध होत आहे. लगतच्या परिसरातील मूर्तीकार येथेच आपले बस्तान मांडत असल्याने हनुमान चौक ते माता मंदिर चौक हा मार्ग सध्या नागपूरच्या चितारओळी प्रमाणेच गजबजू लागला आहे. त्यात माता मंदिर चौकात छत्तीसगड राज्यातील भिलाई पॉवर हाऊस येथील रहिवासी सिताराम चक्रधारी या मूर्तीकारांनी आपल्या पूतण्यासह बस्तान मांडले आहे. पिढ्यानपिढ्या सुरू असलेले मूर्ती बनविण्याचे काम आज ५२ वर्षे वयाच्या सिताराम यांनी १८ वर्ष वय असतानाच हाती घेतले होते. गोंदियात मोठ्या प्रमाणात छत्तीसगड मधून मूर्त्या येत असल्याचे व येथील ख्याती ऐकून आपण यादोराव चक्रधारी व संतराम चक्रधारी या पुतण्यांसह गोंदियात आलो असल्याचे सीताराम यांनी सांगितले.गोंदियात नातेवाईक असून त्यांच्याकडूनही माहिती मिळाल्याने यंदा गोंदिया गाठले असून पहिल्याच वर्षी गोंदियावासीयांकडून चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. यामुळेच त्यांच्याकडे सार्वजनिक मंडळासह मोठ्या संख्येत खासगी लहान मूर्त्यांचे बुकींग आहे. गोंदिया वासीयांना छत्तीसगड मधील मूर्त्यांचे आकर्षण आहे. त्यात मोठ्या श्रद्धा व सुसंपन्नतेत गोंदियाचा उत्सव साजरा होत असल्याची ख्यातीच आम्हाला येथे ओढून आणल्याचे ते सांगतात.