लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला.हर्षला लहानपणापासूनच विज्ञान विषयात रुची आहे. सध्या तो आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात (एमसीव्हीसीला) बाराव्या वर्गात शिकत आहे. गोंदिया येथील शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात एम.सी.व्ही.सी. व आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरिता संयुक्तपणे तंत्र प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रकांत निनाळे, सहायक संचालक मेहंदळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणचे अधिकारी घुले यांनी प्रदर्शनाला उपस्थित राहून प्रतिकृतींची पाहणी करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते.हर्षने जुन्या लुनापासून तयार केलेल्या मॉडिफाईड बाईकला प्रथम क्रमांक देऊन त्याचा सत्कार केला.
गोंदियाच्या हर्षने तयार केली लुनापासून बाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:15 IST
आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला.
गोंदियाच्या हर्षने तयार केली लुनापासून बाईक
ठळक मुद्देतंत्र प्रदर्शनात जिल्ह्यात प्रथम