शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Gondia: मंडई बघायला गेले, माय-लेकास बेदम मारले

By कपिल केकत | Updated: November 16, 2023 16:15 IST

Gondia News: नातीची तब्येत बरी नसतानाही गावातील मंडई बघण्यासाठी गेले या कारणावरून पत्नी व मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गंगाझरी येथे बुधवारी (दि.१५) दुपारी १:३० वाजेदरम्यान घडली.

- कपिल केकत गोंदिया - नातीची तब्येत बरी नसतानाही गावातील मंडई बघण्यासाठी गेले या कारणावरून पत्नी व मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गंगाझरी येथे बुधवारी (दि.१५) दुपारी १:३० वाजेदरम्यान घडली. फिर्यादी छाया मंगल दमाहे (४८, रा.गंगाझरी) व त्यांचा मुलगा पंकज हे दोघे गावातील मंडई बघण्यासाठी गेले होते.

मंडई बघून घरी पतरल्यावर मात्र आरोपी मंगल दादू दमाहे (५०, रा. गंगाझरी) याने नातीची तब्येत बरी नसूनही मंडई बघण्यासाठी गेले या कारणातून छाया यांना शिवीगाळ करून हाताबुक्क्याने तोंडावर मारले. यामध्ये त्यांच्या तोंडाला जखम होऊन एक दात तुटला. तर, पंकज याला शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याच्या हातावर किरकोळ मार लागला. पोलिसांनी छाया दमाहे यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३२५, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी