शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरणात गोंदिया तालुका आहे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातील लसीकरणाबाबत नागरिकांत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्यामुळे लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व यापासून जिल्हाही सुटू शकला नाही. अशात आता कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले.

ठळक मुद्देसर्वाधिक १.१० लाख नागरिकांचे लसीकरण : मोहिमेला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लसीकरणाची मोहीम जोमात सुरू असून, गुरुवारपर्यंत (दि. २९) जिल्ह्यातील ५,८८,८९० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात सर्वच तालुक्यांची कामगिरी चांगली दिसत असून, यामुळेच जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्ह्यात हॉटस्पॉट गोंदिया तालुका आघाडीवर असून, आतापर्यंत तालुक्यातील १,१०,५११ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ९०,०३३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २०,४७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातील लसीकरणाबाबत नागरिकांत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्यामुळे लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व यापासून जिल्हाही सुटू शकला नाही. अशात आता कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले. यानंतर आता शासन लसीकरणावर जोर देत असून, लसीकरणाची चळवळच सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाच्या या चळवळीत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून, राज्यातच अग्रस्थानी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील यंत्रणांची मेहनत फलिताला आली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, गोंदिया तालुका कोरोनात हॉटस्पॉट ठरला असतानाच आता सर्वाधिक लसीकरण करणारा तालुकाही ठरला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १,१०,५११ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ९०,०३३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २०,४७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर - लसीकरणात अर्जुनी-मोरगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून येथे ६४,६१८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ४७,७६६ नागरिकांनी पहिला, तर १६,८५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून, येथे ६१,८८४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५३,५७६ नागरिकांनी पहिला तर ८,३०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सालेकसा तालुका अद्यापही पिछाडीवरच - लसीकरणात सर्वच तालुक्यांची मेहनत सुरू असतानाच मात्र सुरुवातीपासूनच सालेकसा तालुका माघारी दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यात सर्वांत कमी ४१,८१७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ३३,१२१ नागरिकांनी पहिला, तर ८,६९६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अन्य सर्वच तालुक्यांत ५० हजारवर आकडा पार झाला आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस