शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नंगपूरा मुर्री येथून ११.७७ लाखाचा गुटखा व तंबाखू जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: December 9, 2022 15:27 IST

गोदामातही आढळला साठा

गोंदिया : अवैध धंद्याच्या उच्चाटणासाठी गोंदिया जिल्ह्यात पोलीस अधिक्षकांचे विशेष पथक फिरत आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नंगपूरा मुर्री येथील ११ लाख ७७ हजाराची सुंगधीत तंबाखू व गुटखा या विशेष पथकाने पकडला. यात एक ट्रकही ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई ८ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. सुगंधित तंबाखू व वाहनासह २७ लाख ३६ हजार २४७ रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वात ८ डिसेंबर रोजी पोलिस ठाणे गोरेगाव हद्दीत धाड टाकून आरोपी राजेश बुधाराम राजगडे (२६) रा. सिव्हील लाईन, गोविंदपूर, गोंदिया व मासुम चंदु आसवानी (२४) रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया या दोघांचे मालवाहक (एम.एच. ३५ ए.जे. २०७७) जप्त करण्यात आले.

या वाहनाची तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू असा ९ लाख ५८ हजार ६०० रूपयाची तंबाखू, मालवाहक किंमत ६ लाख जप्त करण्यात आले. तसेच गोंदिया शहर हद्दीतील नांगपुरा मुर्री येथील गोदामातून विनापरवाना साठवणूक करून ठेवलेला गुटखा, व तंबाखू एकूण किंमत ११ लाख ७७ हजार ६४७ रूपयाचा माल असा एकूण किंमत २७ लाख ३६ हजार २४७ रूपयाचा माल मिळून आला.

या प्रकरणात राजेश बुधाराम राजगडे (२६) रा. सिव्हील लाईन, गोविंदपूर, गोंदिया व मासुम चंदु आसवानी (२४) रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरीता अन्न औषध प्रशासन विभागास पत्रव्यवहार करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवळेकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पोलीस हवालदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोलीस नायक शैलेषकुमार निनावे, पोलीस शिपाई सन्नी चौरसिया, दया घरत यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदीgondiya-acगोंदिया