शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशाच्या रॉयल्टीवर गोंदियातून रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:49 IST

जिल्ह्यात रेती माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढ चालले आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवून सर्रासपणे जिल्ह्यातील रेती घाटांवरुन रेतीचा उपसा सुरू आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : लाखो रुपयांच्या महसूलावर पाणी, कारवाईकडे दुर्लक्ष, गावकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रेती माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढ चालले आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवून सर्रासपणे जिल्ह्यातील रेती घाटांवरुन रेतीचा उपसा सुरू आहे. हा प्रकार मागील दोन तीन महिन्यांपासून सुरू असून प्रशासनाने केवळ बघ्याची भुमिका घेतली असल्याने लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ वरुन सर्रासपणे पोकलॅनने रेतीचा उपसा केला जात असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला. त्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. तिरोडा तालुक्यातून धापेवाडा मार्गे मध्यप्रदेशात जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे रेतीसह अन्य सामानाची तस्करी करणारे याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या परिसरातील रेती घाटावर मध्यप्रदेशातील रेती माफियांचे प्रस्थ वाढले आहे. घाटकुरोडा येथील रेती घाटावरुन दररोज शेकडो ट्रक रेतीची वाहतूक केली जाते. नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यासाठी पोकलॅनचा वापर करता येत नाही. जेवढ्या रेतीचा उपसा करण्याची रॉयल्टी घेतली आहे तसेच ज्या घाटाचा लिलाव झाला त्याच घाटावरुन रेतीचा उपसा करता येतो. मात्र रेती माफियांनी हे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमर्जीनुसार नदीपात्रातून रेतीचा उपसा करीत असल्याचे चित्र आहे. घाटकुरोडा येथील रेतीची मध्यप्रदेशात वाहतूक करताना या वाहनाची तपासणी केल्यास रेती माफिया कारवाई टाळण्यासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टी दाखवित असल्याची माहिती आहे. ही बाब स्थानिक महसूल अधिकाºयांना सुध्दा माहिती आहे. मात्र अद्यापही त्यांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही. त्यामुळे रेती माफियांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.स्थानिक प्रशासनाच्या मौनावर प्रश्नचिन्हतिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. तसेच पोकलॅन लावून उपसा केला जात असताना स्थानिक प्रशासन मात्र असा काहीच प्रकार सुरु नसल्याचे सांगत आहे. लोकप्रतिनिधीनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मौनाचे नेमके कारण काय असा सवाल या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.भरारी पथक तयार करणारघाटकुरोडा येथील रेती घाटावर सुरु असलेला अनागोंदी कारभार लोकमतने पुढे आणल्यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथक तयार करुन कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.रेती घाटालगत रेतीचे ढिगारेसर्वसामान्य नागरिकांनी घराच्या बांधकामासाठी दोन तीन ट्रक रेतीचा स्टॉक करुन ठेवल्यास महसूल विभागाचे अधिकारी त्याच्या घरी जावून लगेच चौकशी सुरु करतात. मात्र घाटकुरोडा येथील दोन्ही रेती घाटावर किमान वर्षभर पुरवठा करता येईल ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घाटालगत रेतीचा स्टॉक करुन ढिगारे उभारले आहे. मात्र त्यांची चौकशी कुणी करीत नसल्याचे घोगरा येथील गावकऱ्यांनी सांगितलेसीसीटीव्ही घाटांपासून दूरचरेती घाटांवरुन रेतीचे अवैध उत्खनन थांबविण्यासाठी शासनाने रेती घाटांवर सीसीटीव्ही तसेच द्रोणच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निणर्याची जिल्हा महसूल विभागाने अद्यापही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे रेती घाटावरुन रेतीचा अवैध उपसा सर्रासपणे सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

टॅग्स :sandवाळूCrimeगुन्हा