शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:24 IST

२ लाख ६८ हजार मंजूर : १२ हजार २९ बहिणींचे अर्ज झाले रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१५ बहिणींनी अर्ज केले होते. यापैकी २ लाख ६८ हजार ९१५ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे. याचे लाडक्या बहिणींना मोबाइलवर संदेश देखील प्राप्त झाले असून, दाखल केलेल्या अर्जापैकी सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज दाखल केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तर रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोन महिन्यांचे ३ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे सध्या या योजनेचे युद्धपातळीवर केले जात आहे.

जिल्हा महिला व बालकल्याण विभागाची संपूर्ण यंत्रणा यात गेल्या महिनाभरापासून व्यस्त आहे. जवळपास साडेचार हजारांवर कर्मचारी यात परिश्रम घेत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१५ लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २ लाख ६८ हजार ३१५ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर १२ हजार २९ अर्ज अर्जातील विविध त्रुटींमुळे रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे, अर्जाचे हे आकडे केवळ ग्रामीण भागाचे आहे.

शहरातील अर्जाचा यात समावेश नाही. दाखल केलेल्या अर्जापैकी जिल्ह्यातील ९३ टक्के लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले असून, सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांक अकोला आणि तिसऱ्या क्रमांकावर रायगड जिल्हा आहे.

प्रशासनाची जनजागृती, अंमलबजावणीलाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती आणि योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात जिल्हा अव्वल ठरला आहे.

"एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी जि. प. प्रशासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली. व्यापक स्वरूपात जनजागृती केली. त्यामुळेच सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात जिल्हा राज्यात टॉप ठरला आहे."-एम. मुरगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गोंदिया 

टॅग्स :gondiya-acगोंदिया