अर्जुनी-मोरगाव : ब्रम्हांडाला चाकोरीबद्ध चालविणारी एक अदृश्य शक्ती आहे. श्रद्धेने ज्याची आपन पूजा पाट करतो तोही अदृश्य आहे. पण जो विश्वाच्या उदरभरणाची व्यवस्था करतो, जो कधीच कुणालाही काही मागत नाही. सतत र णा बराबराबतो. विकासात ज्याची भागीदारी नव्वद टक्के आहे. त्या शेतकऱ्याला आपण दुर्लक्षित करतो. या युगात जर देव असेल तर तो शेतकरी आहे. त्याला आपण पूजलो पाहिजे. शेतकऱ्याला रोज नमस्कार केला पाहिजे. असे विचार प्रा. बबलू कटरेनी व्यक्त केले. प्रा. कटरे स्थानिक बहुउद्देशिय हायस्कुल येथे आयोजित वार्षीकोत्सवानिमित्त उद्घाटक म्हणून संबोधित होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्था सचिव गोविंदराव ब्राम्हणकर, नगरपंचायत अध्यक्षा पौर्णिमा शहारे, मुख्या. माधवी हुमे, सेवानिवृत्त शिक्षक बांबोळे, एस.टी. मेश्राम, दामोदर चुटे, एकनाथ तरोणे, पांडुरुंग हेमने, डी.आर. बनकर, विद्यार्थी प्रतिनिधी रुपेश पातोडे, तेजल यावलकर उपस्थित होते. कटरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण करतानी सर्व इंद्रिप हे क्रियाशिल ठेवून ताशीकेत बसावे, प्रत्येकात विलक्षण शक्ती आहे नशिब घडविण्यासाठी अखंड परिश्रम व कर्माची गरज असते. प्रत्येकाने विचार प्रवन, विज्ञानवादी व तर्कवादी व्हावे. सत्यतेच्या आधारावर टीकेल अशी शिक्षण व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. मात्र दुदैव्य कपोलकल्पीत व दंतकधांवर आधारीत शिक्षण शिकवले जाते शिक्षकांनी अवांतर वाचन करावे त्यांचेवर समृद्ध व सक्षम भारत निर्माण करण्याची जबाबदारी आहे. वर्ग ८ च्या इतिहासाच्या पुस्तकात महापुरुषांच्या कार्याची माहिती देताना महात्मा फुलेंनी दलीतांसाठी शाळा काढल्याचा चुकिचा उल्लेख केीला असल्याचे मत कटरेंनी व्यक्त केले. यावेळी पौर्णिमा शहारे, गोविंदराव ब्राम्हणकर, एस.टी. मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व माता जिजाऊ, सावित्रीबाई व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनू व पाककला प्रदर्शनीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवी हुमे, अहवाल वाचन रुपेश पातोडे, संचालन मोरेश्वर बोकडे, आभार प्रदर्शन तुलाराम कुंभलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संज़य मुरकुटे, रचना चुटे, एस.आर. परतेकी, एस.बी. फुंडे, मेश्राम, हुमे, ब्राम्हणकर, पटले, नंदनवार, बोरकर, शहारे, फाये यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी )
विश्वाचा देव शेतकरी- कटरे
By admin | Updated: December 26, 2016 01:12 IST