शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या रुपातून देव भेटला; जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:24 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार : दिवसाकाठी ५०० रुग्ण करतात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खासगी वैद्यकीय सेवा आवाक्याबाहेर असल्याने गोरगरीब रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतात. जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असल्याने गरिबांसाठी मोठा आधार होत आहे. नोंदणीचे नाममात्र शुल्क वगळता तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सेवा मिळत असल्यामुळे डॉक्टरांच्या रूपातून आम्हाला देव भेटला, अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांची आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार, तसेच बहुतांश आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असल्याने दररोज बाह्यरुग्ण विभागात सरासरी ५०० रुग्णांची नोंदणी होत आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमुळे गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने रुग्णांचा ओढा आणि विश्वास वाढला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात रोज ५०० जणांवर उपचारयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ५०० रुग्णांची नोंदणी होते. तसेच आंतररुग्ण विभागात सरासरी ४०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू असतात.

६० जणांवर रोज उपचार

  • रस्ते अपघातात गंभीर जखमी, अन्य घटनांतील गंभीर मार लागलेल्या रुग्णांना येथील रुग्णालयात पाठविले जाते.
  • अपघात विभागात दाखल झालेल्या गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार, गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येतात.

हे तर आमचे कर्तव्य"रुग्णसेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. येथील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात."- डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिष्ठाता, गोंदिया

डॉक्टरमुळेच पोरगी वाचली 

"रस्ते अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली होती. गंभीर मार लागल्याने ती बेशुद्ध होती. तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्याप्रयत्नांनी ती बचावली."- सिंधू मेंढे, किडंगीपार

शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया"माझ्या आईचा उजवा पाय फॅक्चर झाल्याने दोनदा खासगी रुग्णालयांत शस्त्रक्रिया केली. मात्र, त्रास कमी झाला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आईला आता आराम मिळाला आहे."- रवींद्र राऊत, रुग्णाचा नातेवाईक. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना