शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘शून्य माता मृत्यू’ची उद्दिष्टपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:25 IST

सन २०१६-१७ मध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या उपजिल्हा रूग्णालयाने अनेक बाबीत उपलब्धी मिळविली आहे.

ठळक मुद्देतिरोडा उपजिल्हा रूग्णालय : सहा महिन्यांत धोकादायक अशा ८७ प्रसूती यशस्वी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०१६-१७ मध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेल्या उपजिल्हा रूग्णालयाने अनेक बाबीत उपलब्धी मिळविली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानाचीसुद्धा तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाने ६ महिन्यांत (अर्धवार्षिक) धोकादायक स्थितीत असलेल्या ८७ प्रसूती सिझेरियनद्वारे यशस्वी करून उद्दिष्टपूर्ती केली आहे.विशेष म्हणजे, तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात त्यांच्या वैद्यकीय चमूने परिश्रम घेवून कायाकल्प कार्यक्रमात महाराष्टÑ राज्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. त्याबद्दल नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जे.पी. नड्डा यांच्या हस्ते १५ फेब्रुवारी रोजी त्यांचा व त्यांच्या चमूचा गौरव करण्यात आला. तसेच मुंबई येथे महाराष्टÑ राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्तेसुद्धा १० जुलै रोजी पुरस्कृत करण्यात आले.यानंतर तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात १ एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सहा महिन्यांच्या कालावधीत सिझेरियनद्वारे धोकादायक असलेल्या ८७ यशस्वी प्रसूती सुरक्षिरित्या करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी सुरू केलेल्या ‘शून्य माता मृत्यू’ अभियानाची उद्दिष्टपूर्ती या सहा महिन्यांत सदर रूग्णालयाच्या चमूने करून दाखविली. तसेच सदर अभियान पुढेही यशस्विरित्या राबविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक व त्यांची चमू परिश्रम घेत आहे. कोणत्याही मातेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होवू नये व नवजात बाळही सुरक्षित असावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.विविध प्रकारच्या २८६ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, नागपूर, पुणे येथील तज्ज्ञांकडून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील टेलिमेडिसिन सेंटरच्या माध्यमाने उपचार करण्यात आला. यासाठी टेलिमेडिसिन सेंटरचे संचालक कमलेश शुक्ला यांनी सहकार्य करीत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला रूग्णांना मिळवून दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेश्राम व त्यांच्या चमूच्या परिश्रमामुळेच सातत्याने पाच वेळा जिल्ह्यातून डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांकाचे पुरस्कार तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाला मिळाले.५८ कुपोषित बालकांवर उपचार१ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील बाल उपचार केंद्रात ५८ कुपोषित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आला. त्यामुळे त्या बालकांची वजनवाढ होवून शारीरिक विकासात भर पडली. तसेच मोतीबिंदूच्या ११९ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्रदान करण्यात आली. तसेच काही रूग्णांना इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हाधिकाºयांनी सुरू केलेले ‘शून्य माता मृत्यू’ अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्ण परिश्रम घेत आहोत. याचीच फलश्रुती म्हणजे मागील सहा महिन्यांत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात एकाही मातेचा मृत्यू झाला नाही. प्रसूत माता व नवजात बाळ यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे.डॉ. हिंमत मेश्राम,वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रूग्णालय, तिरोडा.